विशेष प्रतिनिधी
मॉस्को : युक्रेनसोबतच्या युद्धा दरम्यान रशियाने फेसबुकवर अंशत: बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने क्रेमलिन समर्थित मीडियावर बंदी घातली होती. या कारवाईला उत्तर म्हणून रशियाकडून हे पाऊल उचलले गेले.Russia bans Facebook, responds to action
युक्रेनने शांततेसाठी आवाहन केलं असून ते रशियासोबत चचेर्ला तयार असल्याचं म्हटलं आहे. यावर रशियाने मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, आम्ही युक्रेनवर कब्जा करणार नाही, मात्र रशिया युक्रेनला कोणत्याही किंमतीवर अण्वस्त्रे बनवू देणार नाही.’
रशियाने आपल्या हल्ल्याने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. रशियन हल्ल्यात अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला आहे, तर युक्रेनची अनेक शहरे रशियाच्या ताब्यात गेली आहेत. आता युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा होऊ शकते असे दिसते. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले
असून युक्रेनच्या लष्कराने युद्ध थांबवल्यास रशिया चचेर्साठी तयार आहे. दरम्यान, भारतातील रशियन दूतावासाने अशी माहिती दिली आहे की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनशी चर्चा करण्यास तयार आहेत आणि त्यासाठी ते एक शिष्टमंडळ पाठवणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App