रशिया – युक्रेन युद्ध भडकण्याचा धोका; भारतीयांना लवकर युक्रेन सोडायचा सल्ला; दूतावासाची सूचना जारी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  रशिया – युक्रेन युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मार्शल लॉ डॉक्युमेंट वर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता युक्रेनमध्ये परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रशिया × युक्रेनचे युद्ध हे रशिया विरुद्ध नाटो असे रूपांतरित होण्याची शक्यता आहे. Risk of escalating Russia-Ukraine war

युक्रेन मध्ये नुकतेच झालेले हल्ले पाहता भारतीय दूतावासाने एक पत्रक जारी केले असून भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच बरोबर युक्रेनमध्ये रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे.

बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या चार भागात मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली आहे. लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन या भागात हा कायदा लागू होणार आहे. जे बेकायदेशीरपणे रशियाच्या ताब्यात होते. मार्शल लॉच्या घोषणेनंतर, रशियाच्या सर्व प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आपत्कालीन अधिकार मिळाले आहेत.



व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?

व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, मी रशियन फेडरेशनच्या या चार भागांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या हुकुमावर स्वाक्षरी केली आहे. गुरुवारपासून प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जाईल.

युक्रेनवरील हल्ले वाढणार

अलीकडे रशियाकडूनही युक्रेनवर हल्ले वाढले आहेत. सोमवारी (17 ऑक्टोबर) युक्रेनच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेनच्या वतीने ड्रोन हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याआधी 10 ऑक्टोबर रोजी रशियाकडून युक्रेनमध्ये सुमारे 84 क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.

Risk of escalating Russia-Ukraine war

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात