अल्पवयीन मेहुणीवर धावत्या मोटारीत बलात्कार, २१ दिवसानंतर फुटली वाचा


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा: वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या आमिषाने १७ वर्षांच्या मुलीला सख्ख्या मेहुण्याने घरातून फूस लावून नेत धावत्या मोटारीत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.इज्जतीच्या भीतीने लपविलेल्या या प्रकाराला 21 दिवसानंतर वाचा फुटली.Rape of a minor sister in law in a speeding car

पीडितेने २३ ऑगस्टला दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या विवाहात अडथळा व समाजात बदनामी होण्याची भीती कुटुंबाला वाटत होती. त्यामुळे प्रकरणाची माहिती कोणालाही न देण्याची विनंती चिखली पोलिसांकडे त्यांनी केली होती.मात्र २१ दिवसांनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.चिखलीतील एका १७ वर्षीय मुलीचा २५ ऑगस्टला वाढदिवस होता. २० ऑगस्टला दुपारी घरी आलेल्या जालना येथील तिच्या मेहुण्याने वाढदिवसानिमित्त कपडे खरेदी करून देतो, असे सांगत दुचाकीवर बसवून नेले. एका कपड्याच्या दुकानातून कपडे घेऊन दिले. त्यानंतर घरी न नेता एका मोटारीत जबरदस्तीने बसवले धावत्या गाडीतच तिच्यावर दोनवेळा बलात्कार केला.

जावयासोबत गेलेली मुलगी रात्र होऊनही घरी न आल्याने घरच्यांनी मोठ्या मुलीला माहिती दिली. मेहुण्याने रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पीडितेला घटनेची वाच्यता न करण्याची धमकी देत जालना येथे आपल्या घराबाहेर सोडले. पीडितेने ही बाब तिची बहीण व कुटुंबीयांना सांगितली.

घाबरलेल्या मुलीला धीर देत आई-वडील व मोठ्या बहिणीने २३ ऑगस्ट रोजी सकाळी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार, बलात्कारासह विविध कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तपास सुरू केला.

Rape of a minor sister in law in a speeding car

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण