शिवशाहीरांनी जागविल्या स्वातंत्र्यवीरांच्या तेजस्वी आठवणी…!!; विक्रम संपत यांच्या सावरकर चरित्राच्या पहिल्या भागाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

प्रतिनिधी

पुणे : आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलणे म्हणजे काजव्यांनी सूर्याविषयी बोलण्यासारखे आहे. सावरकर म्हणजे तेज तेज आणि तेजच, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आठवणी जागविल्या. निमित्त होते, विक्रम संपत यांनी लिहिलेल्या सावरकर चरित्राच्या पहिल्या भागाच्या अनुवादाचे प्रकाशन…!! Babasheb Purandare enlightenmend Savarkar brite memoies

हा अनुवाद स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि विश्वस्त मंजिरी मराठे यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या निवासस्थानी करण्यात आले, त्यावेळी शिवशाहीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणी जागविल्या. एखादे फूल ताजे असते तशा सावरकरांच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेजच… आत्ताच्या पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


Babasaheb Purandare ! पुण्यात रंगला बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार सोहळा!आशा भोसलेंनी म्हटलं गाणं ; राज ठाकरेंच मनोगत


सावरकरांशी त्यांची भेट 1938 साली प्रथम झाली. त्यानंतर ते नियमितपणे सावरकरांना भेटत होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समोर एकदा त्यांचा हुबेहुब आवाज काढला. त्यावेळी फक्त नकलाच करत बसणार का?, असा रोकडा सवाल सावरकरांनी बाबासाहेब पुरंदरे यांना केला. नकलांपेक्षा मोठे कार्य आपल्या हातून करण्यासाठीच त्यांनी एक प्रकारे या वक्तव्यातून आपल्याला प्रेरित केल्याचे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. सावरकरांच्या तेजस्वी वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या अनेक आठवणी यावेळी त्यांनी सांगितल्या.

Babasheb Purandare enlightenmend Savarkar brite memoies

महत्त्वाच्या बातम्या