Babasaheb Purandare ! पुण्यात रंगला बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार सोहळा!आशा भोसलेंनी म्हटलं गाणं ; राज ठाकरेंच मनोगत


  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं मनोगत आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीचे विचार.

विशेष प्रतिनिधी

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुण्यात भव्य सत्कार सोहळा झाला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे आणि भाजप आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहास जपत असतानाच वर्तमान जपणारे महापुरूष असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे.Babasaheb Purandare! Rangala Babasaheb Purandare’s felicitation ceremony in Pune! Asha Bhosle sang the song; Raj Thackeray’s mind

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्यात आशा भोसले यांनी मागे उभा मंगेश हे गाणं म्हटलं आणि साहित्यिकांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसृष्टीमध्ये हा सोहळा पार पडला. मी भाषण देणारी नाही. माझ्याआधी ज्यांनी भाषणं केली ती थोर मंडळी आहेत असं म्हणत आशाताईंनी राज ठाकरेंकडे एक कटाक्ष टाकला. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

आशा भोसले-

मी फार शिकलेली नाही, पण आज लेखकांमुळे मला मराठी बोलता येतं. सानेगुरूजींची पुस्तकं वाचली, वि.स. खांडेकर, शिवाजी सावंत यांची पुस्तकं वाचनात आली. शरदबाबूंची पुस्तकं वाचली. वाचनाची इतकी आवड की दिवा नसला तरीही रात्रीचा लाईट रस्त्यावर असायचा त्याच्या झोतात मी पुस्तक वाचत असे. वाचनाची आवड जास्त असल्याने मला लेखकांना भेटणंही आवडत असे. 1933 मधला माझा जन्म. 1943 ला मी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. 53 मध्ये माझं नाव झालं मुंबईत. मग मोठ्या बहिणीचं लग्न होतं तिथे गो. नी. दांडेकर यांना माझ्या भावांनी भेटवलं. अनेक लेखक, कवी मंडळी आली होती. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पेहरावात मी होते. गो. नी. दांडेकर यांना मी विचारलं होतं की तुम्ही लिहिलेली यशोदा खरी आहे का? त्यावेळी एक माणूस पाठीमागून हसले. ते कोण? तर भावाने मला सांगितलं हे बाबासाहेब पुरंदरे.

मी बाबासाहेबांना त्यावेळी विचारलं आमचे आमचे आम्हाला वाढदिवसही लक्षात राहात नाहीत मग शिवाजी महाराजांचा वाढदिवस तुम्हाला कसा लक्षात राहतो? तो सगळा इतिहास कसा लक्षात ठेवता? ते (बाबासाहेब पुरंदरे) हसले माझ्याकडे पाहून. अप्पांना म्हणजे दांडेकरांनाही मी आवडले की मी स्पष्टवक्ते आहे. मुंबईला माझ्या घरात तीन खोल्या होत्या. तेव्हा बाबासाहेब आले तेव्हा म्हणाले मुगाची डाळ कर, भात कर आणि भाजी कर. मग माझ्या लक्षात आलं की पुण्याचे भट आहेत. मी किती नशीबवान की मला अप्पा दांडेकरांनी जैत रे जैत ची कथा ऐकवली होती.

आम्ही एकदा बोलत होतो तेव्हा शिवाजी महाराज एकदा गडावर गेले होते, तेव्हा पाऊस कसा होता ते सांगितलं. गो. नी. दांडेकरांनी एक ड्रेस शिवला तो रेग्झिनचा होता. त्यानंतर हे दोघे पायी गेले. सह्याद्रीच्या वाटांमध्ये हे दोघेही फिरून आले. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेंनी मला हसत हसत सांगितलं. त्यांच्या पायांना जळवा चावल्या होत्या. पाय सुजले होते. त्यानंतर त्यांना चहा करून दिला अशी एक आठवणही आशाताईंनी यावेळी सांगितलं. मी त्यांना विचारलं की अहो शिवाजी महाराज घोड्यावरून जात होते तुम्ही का असे पायी फिरता? मी मनाची ताकद आहे म्हणून मी गेलो होतो. या गोष्टीला आता किती वर्षे झाली.. त्यांची आणि माझी 58 वर्षांची ओळख आहे. ते लिहित असताना, ते त्यांच्या व्यवसायात पुढे जात असताना मी पाहिलेलं आहे.

राज ठाकरे?

1995-96 हे वर्ष असेल तेव्हा ही जागा शिवसृष्टीसाठी देण्यात आली होती. त्यावेळी इथे काही नसायची. या शिवसृष्टीमध्ये येत असतानाच मला बाबासाहेब पुरंदरे यांनी 1974 मध्ये शिवतीर्थावर साकारली होती त्याची आठवण आली. मी त्या शिवसृष्टीमध्ये जात असे आणि राज्याभिषेक सोहळा मी रोज बघायचो. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वागताला आलो होतो. तेव्हा मी सर्वप्रथम त्यांना पाहिलं. त्यानंतर माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकलो. त्यावेळी महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी काम केलं होतं. मी ते देखील पाहिलं आहे.

आशा भोसलेंना कोण म्हणेल की त्या ८८ वर्षांच्या आहेत.. तेव्हा आशाताई चटकन म्हणाल्या की कशाला जाहीर करता? आणि मग एकच हशा पिकला

बाबासाहेब पुरंदरे यांना मी विविधवेळा भेटलो आहे. अनेक विषय समजून घेतले आहेत. मी जेव्हा वाढदिवसाच्या दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांना भेटलो त्यानंतर मला काही पत्रकार भेटले होते. मी त्यांना सांगितलं की जसा इतिहास सांगतात आणि वर्तमानावर भानावर आणतात ते फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब पुरंदरे ज्या पद्धतीने आपल्याला इतिहास सांगतात तसा तो प्रसंग पूर्णपणे आपल्या डोक्यात फिट बसतो असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मला एक प्रसंग आठवतो आहे की कारभार ऐसे करणे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे याबाबत त्यांचं व्याख्यान आणि त्यानंतर इतिहासासोबत ते वर्तमानही आणतात. इतिहासातून ते काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तो आपण समजून घेतला नाही तर तो फक्त इतिहास उरतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकदा मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा चा प्रसंग आठवतो की तलवारी स्वच्छ करत होते बाबासाहेब पुरंदरे. मला त्यांनी त्या तलवारींचं वजन, त्याला छीद्र का असतात? हे सगळं सविस्तर समजावून सांगतिलं.

Babasaheb Purandare! Rangala Babasaheb Purandare’s felicitation ceremony in Pune! Asha Bhosle sang the song; Raj Thackeray’s mind

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात