लैंगिक शोषणाबद्दल अखेर पोप यांनी मागितली पीडितांची माफी

विशेष प्रतिनिधी

व्हॅटिकन सिटी – गेल्या सात दशकांत सुमारे ३ लाख ३० हजार मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर पोप यांनी या घटनेतील पीडितांची माफी मागितली आहे.Pope apologies on sexual harassment

सुमारे अडीच हजार पानी आयोगाच्या अहवालात १९५० पासून चर्चमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी सुमारे तीन लाखांहून अधिक मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे म्हटले आहे. चर्चमधील तीन हजार व्यक्तींपैकी एक तृतीयांश पाद्री किंवा धर्मोपदेशकांचा समावेश होता,असे अहवालात उघड झाले आहे. फ्रान्समधील चर्च येथे लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २०१८ रोजी आयोगाची नियुक्ती केली होती. आयोगात कायदा, आरोग्य, इतिहास, समाजशास्त्र, धर्मशास्त्रसह अन्य विविध विषयांचे २२ तज्ञ सहभागी झाले होते.

व्हॅटिकनच्या प्रवक्त्याने फ्रान्सच्या स्वतंत्र आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील निष्कर्ष क्लेषदायक असल्याचे म्हटले आहे. प्रवक्ते माटेओ ब्रुनी यांनी म्हटले की, पोप यांनी पीडितांच्या वेदनांचा विचार केला आहे. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दु:ख व्यक्त केले असून बोलण्याचे धाडस दाखवल्याबद्दल पोप यांनी आभार मानले आहे.

Pope apologies on sexual harassment

महत्त्वाच्या बातम्या