तालीबान्यांना पाकिस्तानचीच फूस, मुल्ला बरदरकडे पाकिस्तानी पासपोर्ट, आयएसआयचा अफगणिस्थानमध्ये थेट हस्तक्षेप


विशेष प्रतिनिधी

काबूल : अफगाणिस्तानच्या संरक्षण दलांविरोधातील लढण्यासाठी तालिबानला पाकिस्तानचीच फूस आहे. लष्करी, आर्थिक आणि रणनिती ठरविण्यासाठीही पाकिस्तानने गुप्तपणे पाठिंबा दिल्याचा आरोप होता. पाकिस्तानने हे आरोप फेटाळले असले तरी आता पाकिस्तानचा तालीबान्यांशी थेट संपर्क असल्याचे समोर आले आहे. तालिबानचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरदार याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचे समोर आले आहे.Pakistan’s lure to Taliban, Pakistani passport to Mullah Baradar, ISI’s direct intervention in Afghanistan

मुल्ला बरादर याच्याकडे पासपोर्ट आणि पाकिस्तानी ओळखपत्रही आहे. मुल्ला बरदर हा तालीबानचा सह संस्थापक असून कट्टर दहशतवादी आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आएसआयनेच तालीबानला ताकद दिली असेही यामुळे स्पष्ट झाले आहे.



अनुक्रमांक 42201-5292460-5 असलेले आजीवन ओळखपत्र 10 जुलै 2014 रोजी जारी करण्यात आले होते. बरदार यांची जन्मतारीख 1963 वर्ष म्हणून नमूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय ओळखपत्रावर पाकिस्तानच्या रजिस्ट्रार जनरलची विधिवत स्वाक्षरी होती.

बरदरचा पाकिस्तानी पासपोर्ट राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची तारीख एकच होती. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या मुल्ला बरदरला अमेरिकन गुप्तचर दलांनी 2010 मध्ये कराचीमध्ये पकडले होते. अनेक दिवस तो पोलीस कोठडीतही राहिला होता.

मुल्ला उमर यांच्यासह तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरदार हे पाकिस्तानच्या क्वेटामध्ये राहत होते. मुल्ला बरदार याला मुहम्मद आरिफ आगा म्हणूनही ओळखले जाते. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा निदेर्शालयाच्या मुल्ला बरदरला मोहम्मद आरिफ आगा या बनावट नावाने दिल्याचा दावा केलाय.

केवळ मुल्ला बरदरच नव्हे तर तालिबानचे अनेक नेते पाकिस्तानी पासपोर्ट आणि ओळखपत्र बाळगतात असेही उघड झाले आहे. तालिबानचा प्रमुख हिबतुल्ला अखुंदजादाकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुल्ला अखुंदजादा काबुलमध्ये असल्याच्या बातम्या असूनही अद्याप कोणी त्याला पाहिलेले नाही. अखंडजादा कराची येथील पाकिस्तान छावणीत कडक संरक्षणात राहत होता.

Pakistan’s lure to Taliban, Pakistani passport to Mullah Baradar, ISI’s direct intervention in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात