विशेष प्रतिनिधी
दिल्ली : हिंदू संत शिव अवतारी सद्गुरू संत साताराम साहेब यांच्या 313 व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानने एकूण 136 भारतीय नागरिकांना व्हिसा मंजूर केला आहे. दिल्लीमधील पाकिस्तान हाय कमिशनने आज हा निर्णय घेतला. हा जयंती उत्सव 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात होणार आहे. या साठी हा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे.
Pakistan approves visas for 136 Indian nationals for visiting religious sites
1974 सालच्या धार्मिक तीर्थस्थळांच्या भेटीच्या द्विपक्षीय प्रोटोकॉल अंतर्गत भारतातील शीख आणि हिंदू यात्रेकरू पाकिस्तानमधील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी जाऊ शकतात. मागील वर्षी देखील पाकिस्तानने 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळामध्ये एकूण 44 नागरिकांना या जयंती महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी व्हिसा मंजूर केला होता.
PAKISTAN : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसह सहा जणांची निर्दोष मुक्तता; लाहोर कोर्टाचा निकाल
1786 मध्ये संत साताराम साहेब यांनी शादानी दरबार सुक्कुर येथे स्थापन केला होता. यांचा जन्म लाहोरमध्ये 1708 या साली झाला होता. जवळपास तीन दशकांपासून हे धार्मिक स्थळ लोकांचे श्रद्धा स्थान आहे.
2020 मध्ये पाकिस्तानने चकवाल जिल्ह्यातील कटास राज मंदिराला भेट देण्यासाठी एकूण 47 नागरिकांचा व्हिसा मंजूर केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App