हनुमान चालिसाला विरोध करणारे नष्ट होती, बिहारमध्ये जदयू नेत्याच्या वक्तव्यावरून वाद

भारत हा हनुमानाचा देश आहे. येथे हनुमान चालिसा म्हटली जाईल. याला विरोध करणारे नष्ट होतील, असे सिवानच्या जनता दल (युनायटेड) खासदार कविता सिंह यांचे पती अजय सिंह यांनी म्हटले आहे. Opponents of Hanuman Chalisa were destroyed, controversy erupted over JD (U) leader’s statement in Bihar


विशेष प्रतिनिधी

पाटणा : भारत हा हनुमानाचा देश आहे. येथे हनुमान चालिसा म्हटली जाईल. याला विरोध करणारे नष्ट होतील, असे सिवानच्या जनता दल (युनायटेड) खासदार कविता सिंह यांचे पती अजय सिंह यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात ते म्हणाले की, येथे वषार्नुवर्षे हनुमान चालिसाचे पठण होत आले आहे व यापुढेही होत राहील. यावर रोख लावण्याची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. ज्याप्रमाणे लंका जळून राख झाली. त्याचप्रमाणे हनुमान चालिसावर रोख लावणारे व विरोध करणारे जळून भस्मसात होतील.हा देश संविधानाने चालतो. येथे प्रत्येकाला धार्मिक अधिकार आहे, असे जदयू प्रवक्ते नीरजकुमार यांनी म्हटले आहे. भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी अजय सिंह यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

Opponents of Hanuman Chalisa were destroyed, controversy erupted over JD (U) leader’s statement in Bihar

महत्वाच्या बातम्या