J and K NIA Court : फुटीरतावादी नेता यासिन मलिकचा गुन्हा कबूल… पण त्यामागचा नेमका डाव काय??


जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए कोर्टामध्ये आपल्यावरचे सर्व गुन्हे कबूल केले आहेत. युएपीए कलम 16 दहशतवादी कृत्यांमध्ये सामील होणे, कलम 17 दहशतवादी कृत्यांसाठी हवाला रॅकेट मधून पैसे पुरवणे, कलम 18 दहशतवादी कृत्यांची कारस्थाने रचणे आणि कलम 20 दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे या कलमांखाली यासिन मलिक वर एनआयए कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गुन्हे त्याने कबूल केले आहेत. त्याचा प्रतिवाद करण्याची त्याला गरज वाटत नाही विशेष न्यायाधीश प्रवीणसिंह येत्या 19 मे रोजी यासिन मलिकला शिक्षा सुनावू शकतात. Separatist leader Yasin Malik pleads guilty

 बिट्टा कराटे सकट सर्वांवर आरोपपत्र!!

यासिन मलिक यांच्याखेरीज कोर्टाने आज काल फारूक अहमद डार उर्फ ​​बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसर्रत आलम, मोहम्मद यूसुफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वटाली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल राशिद शेख, और नवल किशोर कपूर सहित अन्य काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर देखील वर उल्लेख केलेल्या कलमानुसारच खटले चालणार आहेत. त्यांच्या खेरीज लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद अनेक हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन या पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरुद्धही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

– गुन्हे कबूल करण्यामागचे रहस्य काय??

  •  यासिन मलिक या फुटीरतावादी नेत्याने आपल्यावर चे सगळे गुन्हे कबूल करण्यामागचे रहस्य काय?? कोर्टाने दिलेली शिक्षा त्याला मंजूर होणार का?? तो त्या शिक्षेविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार का?? वगैरे प्रश्न तयार होत आहेत.
  •  या प्रश्नांची उत्तरे यासिन मलिक आणि अन्य फुटीरतावादी नेत्यांच्या विशिष्ट भूमिकेतच दडली आहेत. या सर्व फुटीरतावादी नेत्यांना भारतीय न्यायव्यवस्था अथवा भारतीय प्रशासन व्यवस्था मान्य नाही. त्यामुळे अर्थातच त्यांना एनआयए कोर्ट मान्य असण्याची सुतराम शक्यता नाही. तरी देखील त्या कोर्टात युएपीए कायद्याखाली लावलेले आरोप मान्य करतात याचा अर्थ ते स्वतःला काश्‍मिरी स्वातंत्र्यसैनिक म्हणवतात.
  •  कोर्टाने सजा दिली की त्याचा ते प्रपोगंडा करण्याचा मनसूबा राखतात. भारतीय न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था आपल्यावर म्हणजे काश्मिरींवर कसा अन्याय करत आहे याचा धिंडोरा पिटण्याचा त्यांचा कावा आहे. आणि त्यातूनच यासिन मलिक सारखे फुटीरतावादी नेते आपल्या वरचे सर्व आरोप मान्य करून मोकळे होत असण्याची शक्यता दाट आहे.
  •  यूपीए सरकारच्या वाटाघाटींमध्ये सन्मान
  •  हाच तो यासिन मलिक आहे, ज्याला आधीच्या यूपीए सरकारमध्ये वाटाघाटींसाठी सन्मानपूर्वक बोलावले जात होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या बरोबर तो दिसत असे. आता मात्र केंद्र सरकारने फुटीरतावादी नेत्यांच्या विरोधात कठोर पावले उचलत त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले आहे. त्यामुळे देखील फुटीरतावादी नेत्यांवर एक विशिष्ट दबाव तयार झाला आहे. ही वस्तुस्थिती देखील बरीच बोलकी आहे.
  •  या पार्श्‍वभूमीवर यासिन मलिक आणि अन्य फुटीरतावादी नेते आता पुढची चाल कशी खेळतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Separatist leader Yasin Malik pleads guilty

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात