छोट्या शेजारी देशांवर वर्चस्व गाजविण्याचा चीनचा प्रयत्न नाही – जिनपिंग


विशेष प्रतिनिधी

बीजिंग – आग्नेय आशियावर किंवा छोट्या शेजारी देशांवर वर्चस्व गाजविण्याचा चीनचा प्रयत्न नाही, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्पष्ट केले. दक्षिण चिनी समद्रात इतर देशांबरोबर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.No intention to dominate small nations – china

दक्षिण चिनी समद्रावर चीनने दावा सांगितला असून मलेशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई आणि फिलीपीन्स या ‘आसियान’ देशांचा त्याला विरोध आहे. मात्र, सामर्थ्यशाली नौदलाच्या जोरावर चीनने या देशांची अनेकदा अडवणूक केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.



चीनने या समद्रातील बेटांवरही बेकायदा ताबा मिळवत तेथे धावपट्टी तयार केली आहे.‘आसियान’ गटातील १० सदस्य देशांची व्हर्च्युअल बैठक झाली. यावेळी जिनपिंग यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या गटाला तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही बैठक झाली. यावेळी जिनपिंग म्हणाले की,‘‘वर्चस्ववादाला आणि सत्तेच्या राजकारणाला चीनचा विरोध आहे.

सर्व शेजारी देशांबरोबर शांततेचे आणि मैत्रीचे संबंध असावेत, अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळे आग्नेय आशियावर किंवा इतर छोट्या शेजारी देशांवर वर्चस्व मिळविण्याचा आमचा कोणताही इरादा नाही.’’

No intention to dominate small nations – china

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात