मोस्ट वॉन्टेड कोलंबियन ड्रग लॉर्ड ओतोनीएल पोलिसांच्या अटकेत


विशेष प्रतिनिधी

कोलंबीया : पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया हे कोलंबिया मधील एक ड्रग लॉर्ड म्हणून ओळखले जाणारे द मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होते. 1993 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोलंबीया हे असे राष्ट्र आहे जिथे एक ड्रग लॉर्ड मरतो न मरतो तर दुसरा उभा राहतो. मागील बऱ्याच वर्षांपासून कोलंबिया मादक पदार्थांचे सेवन त्याचे उत्पादन करणे या समस्यांमुळे ग्रासलेला आहे. ड्रग्जची समस्या जर समूळ नष्ट करायचे असेल ते ड्रग्ज उत्पादकांना अटक केली पाहिजे. आणि नेमके हेच कोलंबिया मधील सरकारने केले आहे.

Most wanted Colombian drug lord Otoniel arrested by police

पॉब्लो नंतर कोलंबियामध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्याचा लॉर्ड म्हणून ओळखला जाणारा ओतोनीएल ज्याचे खरे नाव आहे दाइरो आंतोनियो उसुगा. त्याच्यावर कोकेनची डझनभर शिपमेंट युनायटेड स्टेट्समध्ये पाठवण्याचा, पोलिस अधिकार्‍यांची हत्या, अल्पवयीन मुलांची भरती आणि इतर गुन्ह्यांमध्ये मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत.

कोलंबियाच्या अधिकार्‍यांनी मागील एक दशकभर शोध घेतल्यानंतर आत्ता ऑक्टोबर 2021 मध्ये त्याला पकडण्यात कोलंबिया पोलिसांना यश आले आहे. त्याला पकडले तेव्हा त्याच्या अटकेसाठी 132 वॉरंट जारी करण्यात आले होते.


Aryan khan drugs case : ‘या ‘ दिग्दर्शकाने म्हटले बॉलीवूडचे मौन लाजिरवाणे ; आज त्याचा मुलगा आहे- उद्या तुमचा असेल…


कोलंबियामध्ये ओतोनीएलची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक नाही दोन नाही तर तब्बल 43 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तर अमेरिकेमध्ये त्याच्या नावाने 5 दशलक्ष डॉलर म्हणजे 37 कोटी रुपयांचे बक्षीस होते. अमेरिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे, ड्रग हे अमेरिकेसाठी सर्वांत मोठी समस्या आहे. अमेरिकेमधील जास्तीत जास्त तरुण पिढी तसेच अमेरिकेतील बरेचसे लोक अमली पदार्थांच्या सेवनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अनेकांचा ड्रग ओव्हरडोसमुळे जीवदेखील गमवावा लागतो आहे. नुकताच आलेल्या कोरोना महामारीच्या काळात अमेरिकेमध्ये तब्बल 93000 लोक फक्त अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. असा अमेरिकी सरकारने निष्कर्ष काढला आहे. त्याचमुळे अमेरिकेतही ओतोनीएल हा मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये होताच.

ओतोनीएल याला पकडण्यासाठी कोलंबियाने विशेष दलाचे 500 हून अधिक सदस्य आणि 22 हेलिकॉप्टर यांची मदत घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार ओतोनीएल यांनी 300 नगरपालिकांपर्यंत साम्राज्य प्रस्थापित केले होते. 2017 मध्ये कोलंबियाच्या न्यायप्रणाली अंतर्गत तडजोड करायची होती पण सरकारने त्यांना ताब्यात घेण्यासाठी सुमारे 1000 सैनिक तैनात केले हाेते. माध्यमांच्या अहवालानुसार त्यांनी गल्फ प्लानला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे उत्तर युनियनला जंगलामध्ये आश्रय घेऊन लपावे लागले होते. पण वायव्य कोलंबियातील आंतिओक्विया राज्यातील एका खेड्यामध्ये त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती अध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी दिली आहे.

Most wanted Colombian drug lord Otoniel arrested by police

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात