हमासचे कंबरडे मोडल्याशिवाय इस्रायल स्वस्थ बसणार नाही


जागतिक दबाव झुगारुन स्वदेशाचे संरक्षण करण्यात माहीर असलेल्या इस्रायलने गेल्या तीन दिवसात मुस्लिम दहशतवादी संघटना हमासला चांगलाच दम दिला आहे. पॅलेस्टाईनचे सरकार एकीकडे तहाची मागणी आडून करत आहे तर दुसरीकडे हमासचे दहशतवादी इस्रायलशी लढण्याची खुमखुमी दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी शुक्रवारी (दि. 14) हमासला पुन्हा एकदा जबरदस्त इशारा दिला आहे. पॅलेस्टाईनचे कंबरडे मोडल्याशिवाय इस्रायल आता थांबणार नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. Israel will not rest until it breaks Hamas in to shackles


वृत्तसंस्था

तेल अविव : “सुट्टीच्या दिवशी हमासने आपल्यावर हल्ला केला. त्यांनी आपल्या राजधानीवर (जेरुसलेम) हल्ला केला. त्यांनी आपल्या शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. याची किंमत ते आता मोजत आहेत.

आणखी जबरी किंमत त्यांना मोजावी लागेल. आपली माणसं आणि आपली शहरं सुरक्षित ठेवण्यासाठी आपण वाट्टेत त्या थराला जाऊ,” अशी कडक भाषा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी वापरली आहे.बेंजामिन शुक्रवारी (दि. 14) दुपारी तेल अविव येथे बोलत होते. तत्पुर्वी त्यांनी देशाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. नेत्यानाहू म्हणाले की, हमास आणि इतर दहशतवादी संघटनांना आपण चांगली

अद्दल घडवू असे मी म्हणालो होते आणि आपण तेच करत आहोत. गेल्या चोवीस तासात आपण हमासच्या भूमीगत तळांनाही लक्ष्य केले आहे. बिळांमध्ये लपून आपण सुरक्षित राहू असे हमासला वाटत होते.

पण ते तिथेही लपून राहू शकत नाहीत. हमासच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना वाटते की आपल्या हल्ल्यांना चकवून ते उडून जाऊ शकतील. पण ते उडूही शकणार नाहीत. सर्व मार्गांनी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा उल्लेख ‘माझे मित्र’ असा करुन नेत्यानाहू म्हणाले, “बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान आणि ऑस्ट्रियाच्या चँन्सलर, जर्मनीच्या चँन्सलर आणि इतर अनेकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो.

स्वसंरक्षणाच्या आपल्या नैसर्गिक अधिकाराला या सर्वांनी पाठींबा दिला. सर्वसामान्य नागरिकांची ढाल करुन त्यांच्या आडून आपल्या नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार त्यांनी मान्य केला.”

Israel will not rest until it breaks Hamas in to shackles

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण