यमुनोत्री मंदिर खुले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला पूजा

विशेष प्रतिनिधी

उत्तरकाशी : चारधाम यात्रेचा भाग असलेले यमुनोत्री मंदिर अक्षय्य तृतीयेनिमित्त दुपारी सव्वा बारा वाजता उघडण्यात आले. केवळ काही पुजारी आणि प्रशासकीय अधिकारी मिळून २५ जणांना आटोपशीर कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात आला.Yamnotri Temple opens

पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली, असे तीर्थ पुरोहित पवन उनीयाल यांनी सांगितले. कोरोना साथीमुळे भाविकांना मंदिरात प्रवेशास मनाई आहे.याशिवाय चारधाम यात्राही सलग दुसऱ्या वर्षी पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. यात्रा जरी रद्द करण्यात आली असली तरी

चारही मंदिरे मात्र नियोजित वेळापत्रकानुसार उघडली जातील. गंगोत्री मंदिर येत्या शनिवारी, केदारनाथ १७ मे, तर बद्रीनाथ १८ मे रोजी खुले होईल. मंदिरांमध्ये नित्योपचार व पूजाअर्चा सुरु राहणार आहे.

Yamnotri Temple opens

महत्त्वाच्या बातम्या