हिमालयाच्या पर्वतरांगेत दिले दुर्मीळ लाल कोल्ह्याने दर्शन


विशेष प्रतिनिधी

उत्तराखंड : हिमालयाच्या पर्वतरांगेत दुर्मीळ लाल कोल्ह्याने दर्शन दिले आहे. वुल्प्स वुल्प्स ग्रिफिथी अशा शास्त्रीय नावाचा हा कोल्हा अनेक दशकांनंतर दिसला आहे.Red fox seen in Himalaya Regan

उत्तराखंडमधील भुजानी आणि खालिया परिसरात हा प्राणी दिसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. हिमालयातील अधिवासापासून साधारणपणे ५०० मीटर खालच्या भागात हा कोल्हा दिसला.



या भागातील स्वयंसेवी संस्था गेल्या दोन वर्षांपासून या कोल्ह्याचा शोध घेत होत्या. पण हे प्रयत्न निष्फळ ठरले होते. मात्र यातील आठ उपप्रजातींच्या कोल्ह्यांनी दर्शन दिले. हा कोल्हा लाजाळू म्हणून ओळखला जातो.

तो हिमालयात कमी उंचीवर सहसा आढळत नाही. मात्र, हिमालयातील मूळचे अधिवास नष्ट झाल्याने तो कमी उंचीवर दिसत असावा. हिमालयातील इतर भागावर जीवंत राहण्यासाठी तो मानवी वस्तीच्या नजीक आल्याचे मानले जाते.

हिमालयातील अधिक उंचीवरील भागात प्राण्यांचे वसतीस्थान नष्ट होण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात, औषधी वनस्पती आणण्यासाठी मनुष्याचा या भागात प्रवेश करण्याचाही समावेश आहे. मानवी हस्तक्षेपामुळे या प्राण्यांची नैसर्गिक शिकार कमी होत असून हवामान बदलामुळे त्यांच्या अधिवासावर गदा येत आहे.

Red fox seen in Himalaya Regan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात