इवल्याशा भूतानने लसीकरणात विकसित देशांच्या मारली तोंडात, १८ वर्षांवरील ९३ टक्के जणांना लस

विशेष प्रतिनिधी 

थिम्फू : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या इवल्याशा भूतानने प्रथमपासूनच लसीकरणात आघाडी घेतली आहे. या देशातील लसीकरणाचा वेग इस्राईल, अमेरिका आणि वेगवान लसीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या इतर बहुतेक देशांपेक्षा अधिक आहे.Bhutan takes lead in vaccination

भूतानला भारताकडून जानेवारी महिन्यातच लशींचे दीड लाख डोस दिले होते.भारतासारख्या देशात सध्या लसीकरणावरून रणकंदन सुरु असताना भूतानने मात्र लसीकरणाचे मह्त्वा वेळीच ओळखले आहे.लसीकरण करवून घ्यायला जिथे बहुतेक देशांना काही महिने लागले, तिथे भूतानने १६ दिवसांमध्येच महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान असलेल्या या देशात १८ वर्षांवरील ९३ टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

एकूण आठ लाख नागरिकांपैकी ६२ टक्के जणांना लस देण्यात आलेली आहे. याबाबतीत केवळ सेशेल्स हा देशच त्यांच्यापेक्षा पुढे आहे. सेशेल्समध्ये एकूण जनतेपैकी ६६ टक्के जणांना लस दिली आहे.

Bhutan takes lead in vaccination