India's Nation First policy on corona vaccination, exporting only when the country's needs are met

चिंता मिटली! लसीकरणात भारताचे Nation First धोरण, देशाची गरज भागल्यावरच निर्यातीचा विचार

corona vaccination : कोरोना महामारीने देशात पुन्हा जोर पकडल्यामुळे भारत आता देशांतर्गत लसीकरणावर लक्ष केंद्रित करणार असून लस निर्यातीचा सध्याच कोणताही विस्तार होणार नाही, असे वृत्त या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे. याच अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, निर्यातीवर कुठलीही बंदी घातली जाणार नाही, परंतु देशांतर्गत गरजा भागवल्यानंतरच इतर देशांना लसीचा पुरवठा केला जाईल. ते म्हणाले की, भविष्यातील निर्यात ही देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढविण्याशी जोडण्यात आली आहे. India’s Nation First policy on corona vaccination, exporting only when the country’s needs are met


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीने देशात पुन्हा जोर पकडल्यामुळे भारत आता देशांतर्गत लसीकरणावर लक्ष केंद्रित करणार असून लस निर्यातीचा सध्याच कोणताही विस्तार होणार नाही, असे वृत्त या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे. याच अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, निर्यातीवर कुठलीही बंदी घातली जाणार नाही, परंतु देशांतर्गत गरजा भागवल्यानंतरच इतर देशांना लसीचा पुरवठा केला जाईल. ते म्हणाले की, भविष्यातील निर्यात ही देशांतर्गत उत्पादनाची क्षमता वाढविण्याशी जोडण्यात आली आहे.

“आम्ही जगभरातील देशांना व्यावसायिक पुरवठा व लसींचे अनुदान देऊन मदत केली असून यापुढेही ते सुरू राहील,” असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, सर्व व्यापारी सौदे आणि निर्यातीच्या वचनबद्धतेचा देशाद्वारे सन्मान केला जाईल.

त्यांनी सांगितले की, सरकारची प्राथमिकता ही देशातील नागरिकांचे लसीकरण असेल. देशातील लस उत्पादन क्षमता वाढत असताना आणि अधिक लसींसाठी आपत्कालीन वापराची अधिकृतता मंजूर झाल्यामुळे सरकार दोन महिन्यांनंतर निर्यातीशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

लस निर्यात कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामागे अनेक घटक आहेत, त्यात एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येतील वाढ हे एक आहे. यामुळे देशातील लसीकरण कार्यक्रमावर भर देणे आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील वयाच्या प्रत्येकासाठी लसीकरण खुले करणे, असे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचे डबल म्युटेशन आढळले असून राज्यातील रुग्णसंख्येने देशाच्या चिंतेत भर घातली आहे. 11.7 दशलक्ष रुग्णसंख्येसह अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. लस उत्पादकांनी देखील असे सूचित केले आहे की, सध्याचे लक्ष्य देशांतर्गत गरज भागविण्यावरच आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ अदार पूनावाला यांनी २१ फेब्रुवारी रोजी ट्वीट केले होते की, “प्रिय देश आणि सरकार, तुम्ही कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असताना, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की, थोडा धीर धरा, सीरम इंडियाला भारताच्या मोठ्या गरजा भागवण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आम्ही यासह उर्वरित जगाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”

India’s Nation First policy on corona vaccination, exporting only when the country’s needs are met

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*