अफगाणिस्तानमधील संघर्ष संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर, भारताने जगाला सुनावले


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधील संघर्ष आणि अशांतता संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर असून सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन भारताने सर्वांना केले आहे. India warn world on Afgan issue

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती आलेल्या भारताने पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तानमधील वास्तव स्थिती बद्दल अत्यंत गंभीर चर्चा घडवून आणली आणि जगाला या देशातील अस्थिरतेचे गांभीर्य पटवून दिले.

भारताकडे एक ऑगस्टला सुरक्षा परिषदेचे फिरते अध्यक्षपद महिनाभरासाठी आले आहे. या आठवड्यात भारताने अफगाणिस्तानमधील संघर्षग्रस्त परिस्थितीबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी शुक्रवारी बैठक घेतली. एकीकडे शांतता चर्चा करत असलेल्या तालिबानने अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत.

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर सुरक्षा परिषदेत चर्चा नियोजित नव्हती. मात्र, अध्यक्षपदाच्या पहिल्याच दिवशी भारताने वेळापत्रक बदलत अफगाणिस्तानवर चर्चा घडवून आणली. या चर्चेचा लवकरच अपेक्षित परिणाम दिसून येईल आणि सुरक्षा परिषदेतील सदस्य देश या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र येतील, अशी आशा भारताने व्यक्त केली.

India warn world on Afgan issue

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात