मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या होती हे सीबीआय एक वर्ष झाले तरी सिद्ध करु शकलेली नाही. मात्र, या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान करण्यात आल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.Nabab Malik targets on Sushant Issue
एखादी घटना ज्या राज्यात घडते त्या राज्याकडेच तपास राहतो. मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App