इमानदारी…पंतप्रधानांनी सरकारी पैशातून जेवण केल्याने आयकर विभागाकडून चौकशी, सगळे पैसे सरकारी तिजोरीत भरण्याचे पंतप्रधांनाचे आश्वासन


भारतामध्ये भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे. तळे राखील तो पाणी चाखेल सारख्या म्हणींमधून खाबुगिरीचे समर्थनही केले जाते. परंतु, फिनलंडमध्ये पंतप्रधानांनी सरकारी पैशाने जेवण केल्याने चक्क पोलीस आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली. पंतप्रधानांनीही याबाबत चर्चा सुरू झाल्यावर सर्व पैसे सरकारी खजिन्यात परत करणार असल्याचे म्हटले आहे.Honesty … Inquiry from Income Tax Department for PM eating out of government money, PM promises to deposit all money in government coffers


विशेष प्रतिनिधी

हेलसिंकी : भारतामध्ये भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे. तळे राखील तो पाणी चाखेल सारख्या म्हणींमधून खाबुगिरीचे समर्थनही केले जाते. परंतु, फिनलंडमध्ये पंतप्रधानांनी सरकारी पैशाने जेवण केल्याने चक्क पोलीस आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली.

पंतप्रधानांनीही याबाबत चर्चा सुरू झाल्यावर सर्व पैसे सरकारी खजिन्यात परत करणार असल्याचे म्हटले आहे.३५ वर्षीय सना मरीन या फिनलंडच्या पंतप्रधान जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.



जगातील प्रभावशाली महिलांमध्येही त्यांचा समावेश होतो. मात्र, म्हणून फिनलंडचे नागरिक त्यांचे लाड करत नाहीत.भारतामध्ये ठिकठिकाणी असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राजकारण्यांसाठी खानसाम्यापासून सगळ्या व्यवस्था असतात.

एखादा मंत्री सर्कीट हाऊसमध्ये जेऊन गेल्यावर त्याचे बिल दिले की नाही याबाबत विचारही केला जात नाही. परंतु, सना मरीन यांनी एक महिन्याचे आपले जेवणाचे बिल सरकारी पैशातून दिले.

हे बिल झाले होते १७ हजार डॉलर म्हणजे भारतीय रुपयात १२ लाख रुपये. मात्र, याबाबतची माहिती उघड झशल्यावर पोलीस आणि आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केली.

याबाबत वाद सुरू झाल्यावर सना मरीन यांनी हे बिल सरकारी खजिन्यत भरून टाकले. त्या म्हणाल्या, येथून पुढे कधीही सरकारी पैशातून वैयक्तिक खर्च करणार नाही. आत्तापर्यंत जे पैसे खर्च झाले आहेत ते देखील भरणार आहे.

पंतप्रधानांना सरकारतर्फे जेवणाची व्यवस्था केली जाते. परंतु, यापुढे मी सरकारी पैशातून जेवणाचा खर्च करणार नाही. मला आणखी खूप कामे आहेत. त्यामुळे जेवणाच्या पैशावरून वादात मला वेळ वाया घालवायचा नाही.

सना मरीन यांनी अत्यंत संघर्षातून यश मिळविले आहे. त्यांच्या कुटुंबातील पदवीधर झशलेल्या त्य पहिल्या आहेत. १९८५ साली जन्मलेल्या सना लहान असतानाच त्यांच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला.

त्यामुळे कुटुंबाला हलाखीत दिवस काढावे लागले. केवळ तीस वर्षांंच्या असताना त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर परिवहन मंत्रीही झाल्या. वयाच्या ३३ व्या वर्षी २०१९ मध्ये त्या पंतप्रधान झाल्या.

Honesty … Inquiry from Income Tax Department for PM eating out of government money, PM promises to deposit all money in government coffers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात