विजयामुळे ममता बेभान, पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली आणि बैठकीतून मध्येच निघूनही गेल्या


आधीच मर्कट त्यात मद्य पिलेले अशी म्हण आहे. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अशीच अवस्था झाली आहे. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यावर पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीवेळी ममतांनी त्यांचा अपमान केला. बैठकीस अर्धा तास उशिरा पोहोचून त्यांनी पंतप्रधानांना प्रतिक्षा करायला लावलीच, पण अर्ध्यातच निघूनही गेल्या. The victory made Mamata unconscious, made the Prime Minister wait for half an hour and even walked out of the meeting.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: आधीच मर्कट त्यात मद्य पिलेले अशी म्हण आहे. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अशीच अवस्था झाली आहे. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यावर पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीवेळी ममतांनी त्यांचा अपमान केला. बैठकीस अर्धा तास उशिरा पोहोचून त्यांनी पंतप्रधानांना प्रतिक्षा करायला लावलीच, पण अर्ध्यातच निघूनही गेल्या.

यास चक्रीवादळान झालेल्या नुकसानीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा करत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केली. यानंतर बैठक घेऊन आढावा घेतला. पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मिदनापूरच्या कलाईकुंडामध्ये पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अर्धा तास उशिराने आल्या. एवढचं नव्हे तर वादळाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल पंतप्रधांना देत आपल्याला जायचे आहे सांगून त्या बैठकीतून अर्ध्यातूनच निघून गेल्या. तुम्ही मला भेटायला खूप दूर आला होता म्हणून मी तुम्हाला भेटायला आले, असे म्हटले. त्या म्हणाल्या, माझे मुख्य सचिव आणि मी, आम्ही तुम्हाला हा अहवाल सादर करीत आहोत. आता मला माझ्या वेळापत्रकानुसार दिघा येथे जावे लागेल. मी रजा घेत आहे.

एवढेच नव्हे तर हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे विमान हे पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा विमानतळावर उतरले. पंतप्रधान मोदी पोहोचल्यावर तेथे कोणीच नव्हतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्याचे मुख्य सचिव हे तिथेच एका भवनात उपस्थित होते. तरीही ते पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले नाहीत.

ममता बॅनर्जींच्या या असभ्य वर्तनावरून केंद्र सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ममता बॅनर्जींचं वर्तन हे मनमानी, अहंकारी, अनपेक्षित आणि जनतेचे नुकसान करणारे आहे. ममतांच्या या असभ्य वर्तनाने संघराज्य रचनेला ठेच पोहोचली आहे, अशी नाराजी केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

ममतांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि गृह सचिवांना प्रजेंटेशनचीही परवानगी दिली नाही. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी वेळ काढला. पण मुख्यमंत्री ममतांचे राजकारण आणि संकुचित विचाराने या आढावा बैठकीवर पाणी फेरलं गेलं. यामुळे ममतांनी पश्चिम बंगालमधील जनतेचे नुकसान केले आहे, अशी टीका करण्यात येत आहे.



यास चक्रीवादळा दरम्यान झालेल्या नुकसानभरपाई साठी मोदींनी मदत कार्यांसाठी १००० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यापैकी ५०० कोटी रुपये त्वरित ओडिशाला वितरित केले जातील. उर्वरित ५०० कोटी हे पश्चिम बंगाल आणि झारखंडसाठी झालेल्या नुकसानाचीच्या आधारे जाहीर केले जाईल.

ममतांनी बैठकीत सहभागी होण्यास टाळाटाळ केल्याबद्दल राज्यपाल जगदिप धनखड यांनी टीका केली. ते म्हणाले, घटनात्मकता किंवा कायद्याच्या राज्याशी सुसंगत नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाºयांनीपंतप्रधानांच्या आढावा बैठकीला हजेरी लावली असती तर राज्य आणि लोकांचे हित झाले असते .

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधला आजचा घटनाक्रम धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नसून संस्था आहेत. दोघांनी जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाबद्दल निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊनच पदग्रहण केलं आहे. संकटाच्या काळात जनतेला मदत देण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार दु:खदायक आहे. जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचं हे एक दुदैर्वी उदाहरण आहे. हे भारतीय संघव्यवस्थेच्या मूळ भावनेलाच धक्का पोहोचवणारं आहे.

ममता बॅनर्जी म्हणल्या की, हिंगलगंज आणि सागरमध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कलाईकुंड येथे भेटले. त्यांना यास चक्रीवादळानंतर पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. यासंदर्भातला राज्य सरकारचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला त्यानंतर मी दिघा येथे सुरू असलेल्या बचाव आणि पुनर्बांधणी कामाचा आढावा घेण्यासाठी निघाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मीटिंग दुपारी २.३० ते ३.३० या वेळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. पश्चिम मिदनापूरमधल्या कलाईकुंड भागामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी या बैठकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. या बैठकीला विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांना देखील बोलावण्यात आल्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पारा चढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास उशीर केल्याचा दावा केला जात आहे.

The victory made Mamata unconscious, made the Prime Minister wait for half an hour and even walked out of the meeting.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात