विदेशी शक्तींशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून हाँगकाँगमध्ये संपादकासह चार वरिष्ठ वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना अटक


विदेशी शक्तींशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून हाँगकाँग पोलिसांनी लोकशाही समर्थक वृत्तपत्र ॲपल डेलीचे प्रधान संपादक व चार अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. त्यांच्या कार्यालयांची झडतीही घेण्यात आली.Four senior newspaper workers, including an editor, have been arrested in Hong Kong on suspicion of having links with foreign powers


विशेष प्रतिनिधी

हाँगकाँग : विदेशी शक्तींशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून हाँगकाँग पोलिसांनी लोकशाही समर्थक वृत्तपत्र ॲपल डेलीचे प्रधान संपादक व चार अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. त्यांच्या कार्यालयांची झडतीही घेण्यात आली.

ॲपल डेलीचे प्रधान संपादक रयान लॉ, नेक्स्ट डिजिटलचे सीईओ चेऊंग किम-हुंग, द पब्लिशरचे मुख्य संचालन अधिकारी व अन्य दोन संपादकांना अटक करण्यात आली आहे. हाँगकाँग पोलिसांनी प्रथमच लोकशाही समर्थक वृत्तपत्राविरुद्ध रासुकाच्या शक्तीचा वापर केला आहे. पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत.या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या ३० पेक्षा अधिक लेखांमुळे चीन व हाँगकाँगच्या विरोधात प्रतिबंध लावण्याच्या विदेशी शक्तींच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असाही ठपका ठेवण्यात आला आहे. हे प्रतिबंध चीनच्या अर्धस्वायत्त शहरात नागरिकांच्या अधिकारांना मर्यादित करण्याच्या चीनच्या पावलाच्या कारवाईच्या प्रत्युत्तरात लावण्यात आले आहेत.

वृत्तपत्राने एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रकारामुळे आम्ही नि:शब्द आहोत. परंतु, यापुढेही आमचे काम सुरूच राहील. या वृत्तपत्राने चीन व हाँगकाँग सरकारने शहरावर नियंत्रणाचा फास आवळण्याच्या केलेल्या प्रयत्नांवर कायम प्रखर टीका केलेली आहे.

१९९७ मध्ये झालेल्या करारापासून चीन मागे हटत असल्याचाही आरोप केला आहे. त्या वर्षी चीनने हाँगकाँगला ब्रिटनकडून आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी ५० वर्षांपर्यंत एक देश दोन विधान असे वचन दिले होते. वृत्तपत्राचे संपादक जिम्मी लाई सध्या २० महिन्यांची कैदेची शिक्षा भोगत आहेत. त्यांना २०१९ मध्ये अनधिकृतरीत्या सभा घेतल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आलेली आहे.

Four senior newspaper workers, including an editor, have been arrested in Hong Kong on suspicion of having links with foreign powers

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था