पाकिस्तानला पुराचा तडाखा : हजारो नागरिकांचा मृत्यू, लष्कराकडून बचाव कार्य सुरू


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानला एक दशकातील सर्वात भीषण पुराचा तडाखा बसला आहे. सुमारे अर्धा देश पूरस्थितीला तोंड देत आहे. त्याचा फटका ३.३० कोटी नागरिकांना बसला आहे. शनिवारी आणखी ४५ जणांचा मृत्यू झाला. जूनपासून आतापर्यंत एकूण एक हजार जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मृतांमध्ये ३०० हून जास्त लहान मुलांचा समावेश आहे. राज्यात मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले, सिंध व बलुचिस्तान प्रांतात पुराने हाहाकार उडाला आहे.Floods hit Pakistan Thousands of civilians died, rescue operation started by army३२ हजार कोटी रुपयांची हानी

पुरामुळे ३२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. कृषी क्षेत्राचे जीडीपीत २३ टक्के योगदान आहे. पाच लाख लोकांचा छावण्यांमध्ये मुक्काम आहे. ४८ हजार नागरिकांची सुटका करण्यात आली असून ७ लाख घरांचे नुकसान झाले आहे.

Floods hit Pakistan Thousands of civilians died, rescue operation started by army

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!