एलन मस्क यांच्या एका ट्वीटने Bitcoin मध्ये 13% उसळी, टेस्ला पुन्हा घेणार क्रिप्टोकरन्सीत पेमेंट

elon musk tweeted tesla will resume bitcoin transactions

Bitcoin : क्रिप्टोकरन्सीची जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा ही चर्चा एलन मस्कशिवाय अपूर्ण राहते. त्यांच्या एका ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सीजची वाढ आणि घट दिसून येते. नेहमीप्रमाणे, मस्क यांच्या नवीन ट्वीटनंतर, आज बिटकॉइनमध्ये सुमारे 13 टक्के वाढ दिसून येत आहे. दुपारी 12 वाजता कॉईन डेस्क वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बिटकॉइन 12.31 टक्क्यांच्या वाढीसह 39,370 च्या पातळीवर व्यापार करत होता. गेल्या 24 तासांतील सर्वात कमी पातळी 35084 डॉलर आणि सर्वोच्च पातळी 39794 डॉलर आहे. elon musk tweeted tesla will resume bitcoin transactions


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : क्रिप्टोकरन्सीची जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा ही चर्चा एलन मस्कशिवाय अपूर्ण राहते. त्यांच्या एका ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सीजची वाढ आणि घट दिसून येते. नेहमीप्रमाणे, मस्क यांच्या नवीन ट्वीटनंतर, आज बिटकॉइनमध्ये सुमारे 13 टक्के वाढ दिसून येत आहे. दुपारी 12 वाजता कॉईन डेस्क वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बिटकॉइन 12.31 टक्क्यांच्या वाढीसह 39,370 च्या पातळीवर व्यापार करत होता. गेल्या 24 तासांतील सर्वात कमी पातळी 35084 डॉलर आणि सर्वोच्च पातळी 39794 डॉलर आहे.

या वेळी इथरियममध्येही 7.19 टक्के वाढ दिसून येत असून ही करन्सी 2494 डॉलरच्या पातळीवर व्यापार करत आहे. एलन मस्क यांनी ट्वीट केले की, टेस्ला पुन्हा बिटकॉइनमध्ये पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात करेल जेव्हा क्रिप्टोकरन्सी मायनिंगमध्ये 50 टक्के स्वच्छ ऊर्जा वापरतील. त्याशिवाय टेस्लाने बिटकॉइन होल्डिंगचा मोठा भाग विकल्याचा दावाही त्यांनी केला होता.

खरं तर दक्षिण आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक सिग्निया फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सीईओ मॅग्दा विरझेस्का यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये हेराफेरीचा एलन मस्कवर आरोप केला. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, टेस्लाने बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली, त्यानंतर एलन मस्क यांनी सतत ट्वीट करून आपली किंमत गगनाला भिडविली, त्यानंतर मस्क यांनी नफा घेतला आणि मोठा हिस्सा विकला.

प्रत्युत्तरात, एलन मस्क म्हणाले की हे चुकीचे आहे. टेस्लाने केवळ 10 टक्के होल्डिंग विकली आहे. कंपनीने हे केले कारण आम्हाला हे पाहायचे होते की, बाजारपेठेत अस्थिरता उद्भवल्याशिवाय बिटकॉइन इन्हेस्टमेंट लिक्विडेट केली जाऊ शकते.

टेस्ला इंकने फेब्रुवारी 2021 मध्ये बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. मेमध्ये मस्क यांनी बिटकॉइनमधून पेमेंट स्वीकारण्यास नकार दिला होता.

elon musk tweeted tesla will resume bitcoin transactions

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती