कच्चे तेलाचे दर प्रतिबॅरेल १०० डॉलरवर; जगात पुन्हा इंधन दरवाढीची शक्यता


वृत्तसंस्था

मॉस्को :आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे दर ३.१४ डॉलरने (३.२२%) वाढून १००.७९५ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. त्यामुळे इंधनदर वाढीची शक्यता वाढली आहे.Crude oil prices at 100 Dollar a barrel; Possibility of world fuel price hike again

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याची धास्ती आणि लाइट स्वीट क्रूडची मागणी कायम राहिल्याने कच्च्या तेलाच्या तेजीचा कल दिसून येत आहे.हे ७ वर्षे ५ महिन्यांतील सर्वात महाग दर आहेत. तरीही ४ महिन्यांपासून इंधन दरवाढ झालेली नाही. ११ जुलै २००८ ला ब्रेंट क्रूडने विक्रमी १४७.०२ डॉलर प्रतिबॅरलची पातळी गाठली होती.



विश्लेषकांनुसार, मार्चमध्ये यूपीसह ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ होऊ शकते. डेलॉय टच तोहमात्सू इंडियाचे भागीदार देबाशिष मिश्रा हे नुकतेच म्हणाले होते की, १० मार्चला निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरांत लिटरमागे ८ ते ९ रुपयांची दरवाढ करू शकतात.

Crude oil prices at 100 Dollar a barrel; Possibility of world fuel price hike again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात