सावरकर चरित्रकार विक्रम संपथ यांच्याविरुद्ध डाव्यांचे षडयंत्र; दिल्ली हायकोर्टाने घेतली दखल!!


प्रतिनिधी

मुंबई : सुप्रसिद्ध इतिहासकार आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्रकार विक्रम संपथ यांच्या विरुद्ध अमेरिकातील डाव्या विचारांचे लोक षड्यंत्र रचत आहेत. त्यातील तीन प्राध्यापकांना विक्रम संपथ यांनी दिल्ली न्यायालयात खेचले आहे. हे तिघे भारतविरोधी कारवायांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झाले होते. तसेच ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित ऑनलाईन चर्चासत्राचेहा ते समर्थक होते. या तीन प्राध्यापकांनी विक्रम संपथ यांची बदनामी केली आहे.Left conspiracy against Savarkar character Vikram Sampath

विक्रम संपथ यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. २०१९ साली ‘सावरकर : इकोज फ्रॉम ए फॉरगाटेन पास्ट 1883-1924’ आणि २०२१ साली ‘सावरकर: ए कन्टेस्टेड लिगसी 1924-1966’ अशी ही दोन पुस्तके आहेत. या पुस्तकांना जगभरातून मागणी आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकांचा समावेश झाला आहे. हीच बाब डाव्या विचारवंतांना गुप्ता आहे. त्यांतील तीन प्राध्यापकांनी संपथ यांच्या विरोधात तर मोहीमच चालवली. त्यांच्यामध्ये ऑड्रेय ट्रश्के हे प्रमुख आहेत. ऑड्रेय ट्रश्के हे रुत्जर्स विद्यापीठाशी संलग्न आहेत, तर अनन्या चक्रवर्ती या जॉर्ज टाउन विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि रोहित चोपडा हे सांता क्लारा विद्यापीठाशी संबंधीत आहेत.

कोण आहेत ऑड्रेय ट्रश्के?

ऑड्रेय ट्रश्के हे हिंदू विरोधी कटकारस्थान रचणा-यांमध्ये केंद्रस्थानी आहेत. ते अमेरिकेत भारत विरोधी कट कारस्थानांमध्ये सहभागी होते. काही महिन्यांपूर्वी ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते, ज्यामध्ये ते प्रमुख वक्ता होते आणि आयोजकांपैकी एक होते. त्यांनी ‘औरंगजेब: द मैन एंड द मिथ’ या पुस्तकात मुघल राजांचे गोडवे गायले आहेत. त्यांना मानवतावादी, संवेदनशील, न्यायप्रिय आणि पत्नीशी एकनिष्ठ असल्याचे दर्शवले आहे. त्याचवेळी औरंगजेबने हिंदूंवर झिझया कर लावला होता, हिंदूंची मंदिरे तोडली, याबाबत मात्र ऑड्रेय ट्रश्के काहीही बोलत नाहीत.

काय आहे प्रकरण? 

विक्रम संपथ यांनी वीर सावरकर यांच्यावर २ पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांविषयी या तीन प्राध्यापकांनी संपथ यांच्यावर कॉपीराइट, रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला होता. या प्रकरणी या प्राध्यापकांनी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीला पत्र लिहिले. हे पत्र सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाले. त्यामध्ये ऑड्रेय ट्रश्के यांच्यासह अनन्या चक्रवर्ती आणि रोहित चोपड़ा हेही सहभागी आहेत.

न्यायालयाने स्वीकारली याचिका 

विक्रम संपथ हे अनेक वर्षांपासून डाव्या विचारवंतांचे लक्ष्य बनले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन पुस्तके लिहिल्यानंतर ते अमेरिकेमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या केंद्रस्थानी आले. अशा वेळी भारत विरोधी कारस्थाने रचणारे त्यांना टार्गेट करत आहेत.

यासाठी रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीसोबत पत्रव्यवहार करून ते गैरसमज निर्माण करत आहेत. ज्याला डाव्या विचारवंतांनी सोशल मीडियावर उचलून धरले आहे. या सर्व प्रकारावर प्रतिबंध आणण्यासाठी विक्रम संपथ हे दिल्ली उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली आहे.

विक्रम संपथ यांना पाठिंबा

प्रखर राष्ट्रवादी विचारांचे लेखक विक्रम संपथ यांना समर्थन मिळत आहे. त्यामध्ये अनेक लेखक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग आहे. त्यामध्ये सुहेल सेठ यांचा समावेश आहे. त्यांनी विक्रम संपथ यांनी लिहिलेल्या पुस्तकांची प्रशंसा केली.

I HAVE READ ALL OF @VIKRAMSAMPATH ‘S BOOKS. HIS INTELLECTUAL INTEGRITY IS ABOVE REPROACH. AS IS HIS SCHOLASTIC BREATH. FOR THOSE DOLTS QUESTIONING EITHER, THEY WOULDN’T BE ABLE TO STRING A SENTENCE IF ASKED BY THEIR OWN CONSCIENCE : SO THEY SHOULD JUST STFU.

— SUHEL SETH (@SUHELSETH) FEBRUARY 13, 2022

लेखक आणि अर्थशास्त्रज्ञ संजीव संन्याल यांनी विक्रम संपथ यांच्याविरोधात षड्यंत्र रचणा-यांचा खरपूस समाचार घेतला.

AS MANY OF YOU ARE AWARE, @VIKRAMSAMPATH IS CONSTANTLY ATTACKED PERSONALLY BY THE LEFT CABAL FOR THE CRIME OF WRITING A BOOK ABOUT SAVARKAR. THE LATEST IS THAT HE IS ACCUSED OF PLAGERISM. THE EVIDENCE IS VERY WEAK AS EXPLAINED BELOW 1/N

— SANJEEV SANYAL (@SANJEEVSANYAL) FEBRUARY 13, 2022

 

Left conspiracy against Savarkar character Vikram Sampath

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण