जगभरातील अर्थव्यवस्थांची वाट लावून चीनच्या अर्थव्यवस्थेने घेतली उसळी


कोरोना व्हायसरचा विषाणू चीनमधील वुहानमधून पहिल्यांदा बाहेर पडला . त्यामुळे आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लागला. अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागला. खुद्द चीनने मात्र जगभरातील अर्थव्यवस्थांची वाट लावून उसळी घेतली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत १८.३ टक्केंची विक्रमी वाढ झाली आहे.China’s economy has picked up, waiting for economies around the world


विशेष प्रतिनिधी

लंडन : कोरोना व्हायसरचा विषाणू चीनमधील वुहानमधून पहिल्यांदा बाहेर पडला . त्यामुळे आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लागला. अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागला.

खुद्द चीनने मात्र जगभरातील अथव्य्वस्थांची वाट लावून उसळी घेतली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत १८.३ टक्केंची विक्रमी वाढ झाली आहे.चीनमध्ये देशांर्गत आणि परदेशी मागणीत झालेली वाढ आणि सरकारचा पाठिंबा यामुळे चीनमधील उद्योगांनी नवीन विक्रम केले आहेत.



चीनमध्ये गेल्या वर्षी याच वेळेला अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्यावेळी सरकार आर्थिक पातळीवर कोणतीही आर्थिक जोखिम घ्यायला तयार नव्हते. मात्र, वर्षभरातच सरकारने उद्योगांना सढळ हाताने मदत केली.

त्यामुळे चीनमधील एकूण उत्पन्नात (जीडीपी) १९ टक्यांनी वाढ झाली आहे. चीनच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केल्यापासून हे प्रथमच घडले आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या आर्थिक तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेत ६.५ टक्यांनी वाढ झाली होती.

चीनच्या अर्थव्यवस्थेने कोरोनापूर्व पातळी गाठली आहे. कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या अर्थतज्ज्ञांच्या मते चीनने कोरोनापूर्व पातळी गाठलीआहे. त्यामुळे सरकारने आता आपला पाठिंबा काढून घेतला आहे. तरीही पुढच्या प्रत्येक तिमाहीत अर्थव्यवस्थेत वाढ होणा आहे.

बांधकाम व्यवसायात तेजी आली आहे. त्याचबरोबर निर्यातीतही वाढ झाली आहे.कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर चीनच्य अर्थव्यवस्थेत ६.८ टक्यांनी घट झाली होती. वुहानमध्ये सुरू झालेल्या या महामारीमुळे ३० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

मात्र, त्यानंतर सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेने उसळी घेतलीआहे.चीनच्या अर्थव्यवस्थेने कात टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे कोेरोनाच्या काळात परदेशातून खूप मोठ्या प्रमाणात आॅर्डर येत आहेत.

त्याचबरोबर मॉल, रेस्टॉरन्स आणि मोटारीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. चीनमधील किरकोळ व्यापारात गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्चमध्ये ३४.२ टक्यांनी वाढ झाली आहे. विश्लेषकांनी २८ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.

China’s economy has picked up, waiting for economies around the world

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात