WB Election 2021 Phase 5 Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज 45 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 1.13 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उत्तर 24 परगणामधील 16, पूर्व वर्धमान आणि नादियामध्ये 8-8, जलपाईगुडीतील सात, दार्जिलिंगमधील पाच आणि कालीमपोंग जिल्ह्यातील एका मतदारसंघात मतदान होईल. एकूण 15789 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदान होईल. WB Election 2021 Phase 5 Poll In Bengal today, 342 candidates for 45 seats
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज 45 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 1.13 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उत्तर 24 परगणामधील 16, पूर्व वर्धमान आणि नादियामध्ये 8-8, जलपाईगुडीतील सात, दार्जिलिंगमधील पाच आणि कालीमपोंग जिल्ह्यातील एका मतदारसंघात मतदान होईल. एकूण 15789 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदान होईल.
कूचबिहारमध्ये सीआयएसएफच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू आणि अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर निवडणूक आयोगाने मतदान स्वतंत्र व निष्पक्ष पार पाडण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 853 तुकड्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी राज्यातील बहुतांश जागांवर भाजप तृणमूल कॉंग्रेसपेक्षा पुढे होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने 32 जागा जिंकल्या, डाव्या आघाडी-कॉंग्रेसने या भागात दहा जागा जिंकल्या, तर भाजपला जागा मिळाल्या नव्हत्या. राज्यात 294 सदस्यांच्या विधानसभेसाठी आठ टप्प्यांत निवडणुका होत आहेत. पहिला टप्पा 27 मार्चला होता आणि अखेरच्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान होईल.
Ahead of phase 5 polling, voters queue up outside a polling booth in Kamarhati, West Bengal#Assemblyelections2021 pic.twitter.com/VdsFrWHi9Z — ANI (@ANI) April 17, 2021
Ahead of phase 5 polling, voters queue up outside a polling booth in Kamarhati, West Bengal#Assemblyelections2021 pic.twitter.com/VdsFrWHi9Z
— ANI (@ANI) April 17, 2021
11 राज्यांमधील दोन लोकसभा आणि 13 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. कर्नाटकातील बेळगाव आणि आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर मध्य प्रदेशातील दमोह, सहारा, सुजानगड आणि राजस्थानमधील राजसमंद, गुजरातमधील मोरवा हदाफ, महाराष्ट्रातील पंढरपूर, उत्तराखंडचा सल्ट, कर्नाटकातील मधुपुर, कर्नाटकातील बसव कल्याण आणि मिझोराममधील सेरछिप, नागालँडमधील नोकसेन आणि तेलंगणाचे नागार्जुन सागर या 13 विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे.
WB Election 2021 Phase 5 Poll In Bengal today, 342 candidates for 45 seats
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App