चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा लागला वाढू, लांझोऊ शहरात लॉकडाउन


विशेष प्रतिनिधी

बीजिंग – चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. लांझोऊ शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. केवळ आरोग्याच्या कारणासाठी आणि जीवनावश्याक गोष्टींसाठीच घराबाहेर पडण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहेत. China facing lockdown once again

सरकारी आरोग्य पथकांनी संपूर्ण शहरात चाचण्यांना सुरुवात केली आहे. संसर्ग झालेल्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.‘चाचण्यांचे प्रमाण जसे-जसे वाढविण्यात येत आहे, तसे संसर्गाचा वेगही वाढण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.



ज्या बीजिंगमध्ये कोरोनाचाही एकही नव्हता तेथे आता नऊ जणांची नोंद झाली आहे.यामुळे स्थानिक प्रशासनाने पुन्हा चाचण्यांना सुरुवात केली आहे.राजधानी बीजिंगमध्ये कोरोना प्रसार रोखण्यासाठी तेथील हॉटेलांचे आरक्षण गेल्या आठवड्यात बंद ठेवण्यात आले होते.

विशेष म्हणजे चीनमधील कोरोना प्रसाराचा वेग भारतासह अन्य काही देशांच्या तुलनेत कमी असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून चीनने लॉकडाउनची घोषणा केली आहे. संपूर्ण चीनमध्ये गेल्या २४ तासांत २९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील सहा रुग्ण लांझोऊतील आहे. आतापर्यंत तेथे २९ रुग्ण आढळले आहेत.

China facing lockdown once again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात