अफगाणिस्तानच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; १८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी


वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.Bombing of a mosque in Afghanistan; 18 killed, many injured

अफगाणिस्तान येथील मजार-ए-शरीफ मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झाले आहेत.



मशिदीतील स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. देशाच्या इतर भागात झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. दरम्यान, ४ स्फोट झाल्याने अफगाणिस्तान हादरला आहे.

दरम्यान, पाकिस्तान सीमेजवळ नांगरहारमध्ये झालेल्या स्फोटात चार जवानांचा मृत्यू झाला आहे. रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये अनेक स्फोट झाले आहेत, ज्यामध्ये अनेक जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Bombing of a mosque in Afghanistan; 18 killed, many injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात