अमेरिकेतील लाखो बेरोजगारांना सोमवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या बेरोजगारी भत्त्याशी संबंधित दोन योजना सोमवारी बंद करण्यात आल्या. अमेरिकेत गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बेरोजगार ज्या वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत, त्यात त्यांना आर्थिक मदतीच्या काही योजनांचा आधार आहे. एका अंदाजानुसार, या योजना संपल्यानंतर सुमारे 89 लाख अमेरिकनांना या सर्व किंवा काही फायद्यांपासून वंचित राहावे लागू शकते. big jolt for unemployed in USA from Biden Administration two schemes related to financial benefits expire
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेतील लाखो बेरोजगारांना सोमवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या बेरोजगारी भत्त्याशी संबंधित दोन योजना सोमवारी बंद करण्यात आल्या. अमेरिकेत गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बेरोजगार ज्या वाईट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत, त्यात त्यांना आर्थिक मदतीच्या काही योजनांचा आधार आहे. एका अंदाजानुसार, या योजना संपल्यानंतर सुमारे 89 लाख अमेरिकनांना या सर्व किंवा काही फायद्यांपासून वंचित राहावे लागू शकते.
अमेरिकेत बेरोजगारांना आर्थिक मदत देण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या योजनांची मुदत काल संपली. यापैकी एका योजनेअंतर्गत स्वयंरोजगार आणि मजुरांना बेरोजगारी भत्ता मिळायचा, तर दुसऱ्या योजनेत जे लोक गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यात यायची. एका अहवालानुसार, “साथीच्या काळात बेरोजगारीचे हे फायदे बंद केल्याने लाखो अमेरिकन लोकांना धक्का बसला आहे. तेही अशा काळात जेव्हा नोकरी मिळवणे कठीण झाले आहे.”
बायडेन सरकारकडून मुदतवाढ नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने बेरोजगारांना दर आठवड्याला स्वतंत्रपणे देण्यात येणारी 21,929 रुपये ($ 300) ची आर्थिक सहाय्य योजनादेखील सोमवारी संपुष्टात आणली. बायडेन सरकारने राज्यांना आपल्या नागरिकांना 21,929 ($ 300) ची आर्थिक मदत सुरू ठेवण्यास सांगितले आहे. यासाठी ते प्रोत्साहनपर पैसे वापरू शकतात. मात्र, कोणत्याही राज्याने आतापर्यंत यावर सहमती दर्शवली नाही.
कोरोना महामारीच्या काळात अमेरिकन सरकारच्या या बेरोजगारी भत्त्यांचा लोकांसाठी खूप उपयोग झाला आहे. एका अंदाजानुसार, यासाठी आतापर्यंत सुमारे $ 650 अब्ज जारी केले गेले आहेत. ज्याच्या मदतीने लाखो अमेरिकन लोकांनी नोकरी गमावूनही त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सोपे झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App