Joe Biden Video: ... President Joe Biden slipped three times while climbing Air Force One

Joe Biden Video : …अन् राष्ट्राध्यक्षांचा पाय घसरला!, विमानात चढताना पायऱ्यांवर तीन वेळा घसरून पडले जो बायडेन, व्हिडिओ झाला व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ (Joe Biden Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाच्या पायऱ्या चढत असताना पडताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विमानाच्या पायऱ्यांवर तीन वेळा पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, बायडेन यांनी बाजूच्या कठड्यांना धरून स्वत:ला सावरले, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. Joe Biden Video: … President Joe Biden slipped three times while climbing Air Force One


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा एक व्हिडिओ (Joe Biden Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायडेन विमानाच्या पायऱ्या चढत असताना पडताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विमानाच्या पायऱ्यांवर तीन वेळा पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, बायडेन यांनी बाजूच्या कठड्यांना धरून स्वत:ला सावरले, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी अटलांटाच्या दौऱ्यावर होते, तेथे ते आशियाई-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांशी भेट घेणार होते. अटलांटाला जाण्यासाठी ते एअरफोर्स वनच्या पायर्‍या चढत होते. यादरम्यान त्यांचा तोल ढासळला आणि ते पायर्‍यांवर पडले. बायडेन यांचा एकदा नव्हे तर सलग तीन वेळा पाय घसरला.विमानाच्या पायऱ्यांवर पडल्यानंतर त्यांनी दोन्ही कठड्यांना धरून स्वत:ला सावरले. पण तिसऱ्यांदा ते गुडघ्यावर पडले. व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन हे विमानाच्या पायर्‍यांच्या रेलिंगला धरून चढताना दिसत आहेत.

पायर्‍याच्या संपून वर गेल्यानंतर, बायडेन यांनी सर्वांना नमस्कार करत विमानात प्रवेश केला. व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव कॅरिन जीन-पियरे यांनी माध्यमांना सांगितले की, राष्ट्राध्यक्ष 100 टक्के ठणठणीत आहेत. पायऱ्यांवरील चुकीचं पडलं होतं, दुसरं काहीही नाही.

पायऱ्या चढताना वाऱ्याचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात आले. कदाचित यामुळेच 78-वर्षीय जो बायडेन यांचा तोल ढासळला.

Joe Biden Video: … President Joe Biden slipped three times while climbing Air Force One

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*