पाकिस्तानात इमरान खान यांच्या हत्येचा बेनझीर भुट्टो हत्येस्टाईल प्रयत्न; रॅलीमध्ये गोळीबारात पायाला जखम


वृत्तसंस्था

वजीराबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते इमरान खान यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. वजीराबाद मध्ये सुरू असलेल्या रॅली दरम्यान त्यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाला आहे. या गोळीबारात इमरान खान यांच्या पायाला जखम झाली असून त्यांना ताबडतोब स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

इमरान खान यांच्या वरील गोळीबाराचा आणि ते जखमी झाल्याचा व्हिडिओ रॉयटर्स या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. वजीराबादच्या जफर अली खान चौकात इमरान खान यांची रॅली सुरू असताना एका युवकाने जवळून त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात काही जण जखमी झाले, तर एक गोळी इमरान खान यांच्या पायाला लागली तेथे मोठा हलकल्लोळ माजला. इमरान खान यांच्या समर्थकांनी ताबडतोब त्यांना एका गाडीत बसवून जवळच्या रुग्णालयात नेले आहे. Benazir Bhutto style assassination attempt on Imran Khan in Pakistan

पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचा रक्तरंजित इतिहास

पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचा कायम रक्तरंजित इतिहास राहिला आहे. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची 1951 मध्ये ते मॉर्निंग वॉकला गेले असताना हल्लेखोराने भोसकून हत्या केली. दस्तूर खुद्द पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा मृत्यूही संशयास्पदच आहे. त्यांना एवढे उच्चपदस्थ असताना आयत्या वेळेला कराची विमानतळापासून घरी येण्या साधी ॲम्बुलन्स देखील मिळाली नव्हती.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान राहिलेल्या जुल्फीकार अली भुट्टो यांना त्यांनीच नेमलेले लष्कर प्रमुख जनरल जनरल जिया उल हक यांनी फाशी दिली. दस्तुरखुद्द जिया उल हक यांचा मृत्यू देखील संशयास्पद रीतीने विमान अपघातात झाला. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची देखील कराची मध्ये अशाच एका प्रचार रॅली दरम्यान गोळीबारात हत्या झाली. त्यावेळी जनरल परवेज मुशर्रफ यांची राजवट पाकिस्तानात होती. त्यांनी निवडणुका जाहीर केल्या होत्या. आणि बेनझीर भुट्टो नवाज शरीफ या दोघांनी आपापल्या राजकीय पक्षांची आघाडी करून मुशर्रफ यांच्या विरोधात टक्कर घेण्याचे ठरवले होते. मात्र बेनझीर भुट्टो लंडनहून पाकिस्तानात आल्याबरोबर प्रचार रॅली दरम्यानच त्यांची कराचीत हत्या झाली होती.

 

इमरान खान यांचे सरकार काही महिन्यांपूर्वीच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पाडले होते. इमरान खान यांनी नव्या शहाबाज शरीफ सरकार विरोधात जनआंदोलन करून देशभर पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेदरम्यानच वजीराबाद मध्ये एका रॅलीत त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.

Benazir Bhutto style assassination attempt on Imran Khan in Pakistan

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात