वृत्तसंस्था
नवी दिल्ली: कॅनडाने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय एजट्सचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे या प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी म्हटले आहे की, अमेरिका कॅनडाच्या आरोपांबाबत अत्यंत चिंतेत आहे, त्यांचा तपासाला पूर्ण पाठिंबा आहे आणि दोषींना न्याय मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे.US tensed over Canada’s allegations, NSA says – won’t give India any ‘special concessions’ in the matter
अमेरिका कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे जेक सुलिव्हन यांनी सांगितले. निज्जर हत्येवरून अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला . अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले, ‘अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचे मी ठामपणे नाकारतो. आम्ही (कॅनडाच्या) आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत, तपास पुढे जावा आणि गुन्हेगारांना जबाबदार धरले जावे अशी आमची इच्छा आहे. हा मुद्दा जगजाहीर झाल्यापासून अमेरिका खंबीरपणे उभी आहे आणि तो पूर्णपणे बाहेर येईपर्यंत ठामपणे उभा राहील.
भारताबद्दल काय बोलले?
कॅनडात शीख ‘अलिप्ततावादी नेत्या’च्या हत्येबद्दल कॅनडाच्या दाव्यानंतर अमेरिका उच्च पातळीवर भारतीयांच्या संपर्कात आहे आणि सरकार याप्रकरणी भारताला कोणतीही “विशेष सवलत” देत नाही, असे जेक सुलिव्हन म्हणाले.
आरोपावर भारताची भूमिका काय?
भारताने कॅनडाचा आरोप ठामपणे फेटाळला आहे. भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांच्या आरोपांचे वर्णन निरर्थक आणि ‘प्रेरित’ असे केले आहे. कॅनडा आपल्या देशात खलिस्तानींना खतपाणी पुरवत असल्याचा आरोप भारताने केला आहे आणि हा मुद्दा अन्यत्र वळवण्यासाठी तो भारतावर असे बिनबुडाचे आरोप करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App