विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेत भाजप खासदाराची जीभ घसरली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना माफी मागावी लागली. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चांद्रयान मोहिमेवर चर्चा सुरू असताना हे काल घडले. BJP MP slips tongue in Lok Sabha; Rajnath Singh apologized
त्याचे झाले असे :
चांद्रयान मोहिमेच्या चर्चेच्या वेळी समाजवादी पक्षाचे खासदार दानिश अली यांनी या मोहिमेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात, असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना भाजप खासदार रमेश बिधूडी मोदीजी श्रेय घेत नाहीत. त्याचे श्रेय वैज्ञानिकांचे आहे, असे सांगितले.
पण त्याच वेळी त्यांची जीभ घसरली. ते दानिश अली यांना उद्देशून मुल्ला, उग्रवादी, आतंकवादी, कटवे असे म्हणाले. इतकेच काय पण त्यांनी तू मला बाहेर भेट बघतो तुझ्याकडे, अशी धमकीही दिली.
रमेश बिधूडी यांचे हे शब्द असंसदीय तर होतेच, पण ते सर्वसामान्य सभ्यतेलाही धरून नव्हते. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा असा गंभीर इशारा दिला. लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधूडी यांचे ते वादग्रस्त वक्तव्य काढून टाकण्यात आले. या सर्व प्रकारावर सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भाजपच्या वतीने माफी मागावी लागली.
ज्या खासदार दानिश अलींना उद्देशून रमेश बिधूडी यांनी असभ्य भाषा वापरली, ते उत्तर प्रदेशातल्या अमरोहाचे बहुजन समाज पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दरातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर अमरोहा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले काँग्रेस आणि भाजप उमेदवारांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता.
काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी मात्र राजनाथ सिंह यांनी मागितलेली माफी पुरेशी नाही. रमेश बिधूडी यांच्या असभ्य वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणी केली
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App