धोकेबाज पाकिस्तानला हाताळण्यात अमेरिकेला अपयश, दहशतवादी तालिबानला फायदा

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – धोकेबाज पाकिस्तानला हाताळण्यासाठी परिणामकारक धोरण आखण्यात अमेरिकेला अपयश आल्यामुळेच अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती निर्माण झाली, अशी टीका अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली सिनेटरने जॅक रीड यांनी केली.US senator targets Pakistan for his work

रीड हे प्रमुख सिनेटर्समध्ये गणले जातात. याचे कारण ते सिनेट सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष आहेत. तालिबानी दहशतवाद्यांचा मार्ग सुकर केल्याचा आरोप पाकवर केला जात आहे. दोन दशकांपूर्वी सत्तेवरून हटविण्यात आलेल्या तालिबानला पाकमुळेच सत्ता पुन्हा काबीज करता असा आक्षेपही घेतला जात आहे.


अफगाणिस्तानची पाकिस्तानला सणसणीत चपराक, अपहरणाच्या घटनेनंतर राजदुताला बोलावले मायदेशी परत


या पार्श्वभूमीवर रीड म्हणाले की, अफगाणिस्तानध्ये गेल्या २० वर्षांत झालेल्या युद्धाशी संबंधित अनेक घटकांचा हा परिणाम आहे. भविष्यातील संघर्षांना सामोरे जाताना याचा विचार आपल्याला करावाच लागेल. अफगाण संकट ही डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाची समस्या नाही.

दोन्ही पक्षांच्या मिळून चार अध्यक्षांच्या प्रशासनाचे अपयश त्यातून अधोरेखित होते. आमची समिती याविषयी सखोल चर्चा करेल आणि काय चुकले याचा आढावा घेईल. भविष्यात अशा चुका टाळण्याचा प्रयत्न असेल.

US senator targets Pakistan for his work

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात