महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे सर्वत्र संताप, दिल्लीत भाजपची पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर निदर्शने

विशेष प्रतिनिधी

पेशावर – लाहोर किल्ल्याजवळ उभारलेल्या महाराजा रणजितसिंग यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याबद्दल येथील शीख समुदायाने संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाला पुतळ्याचे संरक्षण करता येत नसेल तर आम्ही तो पुतळा पेशावरमध्ये घेऊन येतो, अशी प्रतिक्रिया शीख नागरिकांनी दिली आहे.

पाकिस्तानमधील तेहरीके लब्बैक पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने काल महाराजा रणजितसिंग यांच्या नऊ फुटी उंच ब्राँझच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.



दरम्यान, महाराजा रणजितसिंग यांचा लाहोरमधील पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ भाजपने पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर जोरदार निदर्शने केली. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी या निदर्शनांत सहभागी झाले.

यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. महाराजा रणजितसिंग यांच्या लाहोर किल्ल्यातील पुतळ्याची अनेकदा विटंबना करण्यात आली व पाकिस्तान सरकारने तो पुन्हा तेथे बसविला. याआधी लाहोरच्या माई जिंदा हवेलीतील पुतळ्यांचीही पाकिस्तानातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी विटंबना केली होती.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात