जाणून घ्या या ठिकाणी कोण जिंकत आहे?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून मतमोजणीही सुरू आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीसाठी कोणत्याही उमेदवाराला एकूण 270 इलेक्टोरल मते मिळवावी लागतील. यावेळीही निवडणुकीचे निकाल स्विंग स्टेटवर ठरेल, असे मानले जात आहे. स्विंग राज्यांमध्ये कोणता उमेदवार आघाडीवर आहे ते पाहूयात.
कोणती राज्ये स्विंग राज्ये आहेत?
अमेरिकेत एकूण 7 राज्ये आहेत ज्यांना स्विंग स्टेट किंवा बॅटल ग्राउंड स्टेटचा दर्जा देण्यात आला आहे. खरं तर, अमेरिकेतील बहुतेक राज्यांमध्ये रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट पक्षाचे गड आहेत. पण अशी 7 राज्ये आहेत जिथे मतदार प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलताना दिसतात. ही राज्ये ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन आहेत..
7 स्विंग स्टेटमध्ये कोण पुढे?
ऍरिझोना: एकूण 11 इलेक्टोरल मते आहेत. या राज्यातून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत
विस्कॉन्सिन: येथील इलेक्टोरल मतांची संख्या 10 आहे. या राज्यातही डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत.
पेनसिल्व्हेनिया: या राज्यात एकूण इलेक्टोरल मतांची संख्या 19 आहे आणि येथूनही ट्रम्प आघाडीवर आहेत.
जॉर्जिया: एकूण 16 इलेक्टोरल मते आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प येथेही आघाडीवर आहेत.
नॉर्थ कॅरोलिना: या राज्यात ट्रम्प 16 इलेक्टोरल मतांसह आघाडीवर आहेत.
मिशिगन: या राज्यात एकूण 15 इलेक्टोरल मते आहेत. आतापर्यंतच्या गणनेत डोनाल्ड ट्रम्प पुढे आहेत.
नेवाडा: एकूण 6 इलेक्टोरल मतांसह या राज्यातून कोणताही ट्रेंड समोर आलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App