Kashmir : काश्मीरमधील बांदीपोरा येथे एन्काउंटर, एक दहशतवादी ठार; केतसूनच्या जंगलात आणखी एक दहशतवादी लपल्याची माहिती

Kashmir

वृत्तसंस्था

श्रीनगर : Kashmir काश्मीरमधील बांदीपोरा येथील केतसून वन परिसरात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यात एक दहशतवादी मारला गेला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना बांदीपोराच्या चोंटपथरी जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली.Kashmir

शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले, ज्यात एक दहशतवादी मारला गेला. मात्र, या परिसरात आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजूनही चकमक सुरूच आहे.



याआधी 2 नोव्हेंबरलाही श्रीनगरच्या खानयारमध्ये चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. या चकमकीत चार जवान जखमी झाले.

गेल्या पाच दिवसांतील चौथी चकमक

नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच श्रीनगर, बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 3 चकमक झाल्या आहेत. यामध्ये 4 जवान जखमी झाले असून 3 दहशतवादी मारले गेले आहेत. 2 नोव्हेंबरला मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याचे नाव झाहिद रशीद असे होते. दुसरा अरबाज अहमद मीर होता. या दोघांनी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतले होते. बांदीपोरा येथे चौथी चकमक सुरू आहे.

Encounter in Kashmir’s Bandipora, one terrorist killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात