विशेष प्रतिनिधी
वझारिस्तान : दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी नॉर्थ वझारिस्तान जिल्ह्यातील तपासणी नाक्यावर घडली.three pak solders died
अफगाण सीमेलगत असलेल्या हसन खेल भागातील बेझा तपासणी नाक्यावर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. यात तीन सैनिक जागीच ठार झाले. जखमी सैनिकास दावतोई भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी घेतली नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून नॉर्थ वझारिस्तान आणि लगतच्या साउथ वझारिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या सरकारी यंत्रणांना तालिबानकडून लक्ष्य केले जात आहे.
गेल्या आठवड्यात नॉर्थ वझारिस्तानच्या दावतोई भागातील सैनिकी चौकीवर तालिबानने बेछूट गोळीबार केला होता. त्यात दोन सैनिक मारले गेले आणि दोन जखमी झाले.
दरम्यान पाकिस्तानच्या काउंटर टेररिझम डिपार्टमेटच्या तुकडीने क्वेट्टा शहरात पाच दहशतवाद्यांना ठार केले. क्वेटा शहरालगत असलेल्या परिसरात झडतीसत्र सुरू असताना दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार सुरू केला. त्यावेळी सीटीडीने केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App