अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे कंबरडे मोडले ; दोन दिवसांत १७२ दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दिवसांत १७२ तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. सरकारच्या या आक्रमक कारवाईमुळे तालिबानचे धाबे दणाणले असून ही कारवाई म्हणजे तालिबनला मोठा धक्का मानला जात आहे. Huge Attak on Taliban Terrorists in Afghanistan; 172 Terrorists killed in two days

अफगान राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाने दाहशतवाद्यांविरोधात (एएनडीएसएफ) विशेष मोहीम राबवली, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.


अफगाणिस्तानमधील शांततेसाठी आता भारत व पाकिस्ताननेच पुढे यावे, अमेरिकेने घातली गळ


सैन्याच्या माहितीनुसार, नानगड, कंधार, फरियाब, निमरुज, बदख्शां आणि तखार प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत १७२ तालिबानी दहशतवादी ठार झाले. तर, १०० हून अधिक जखमी झाले. दहशतवाद्यांचा म्होरक्या कारी रहमतुल्लाह मारला गेला आहे. काही गावे दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त केली आहेत.

मोठा शस्त्रसाठा जप्त, स्फोटके निकामी

मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच अनेक शक्तिशाली स्फोटकेही नष्ट केली आहेत. यापूर्वी झालेल्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ५० दहशतवादी जखमी झाले, अनेक शस्त्रे जप्त केली असून स्फोटके निकामी केली आहेत.

Huge Attak on Taliban Terrorists in Afghanistan; 172 Terrorists killed in two days

महत्त्वाच्या बातम्या