वृत्तसंस्था
टोरंटो : भारताच्या तीव्र प्रतिक्रियांनंतरही कॅनडातील खलिस्तान समर्थकांची दहशत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ जारी करून हिंदू मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. रविवारी लक्ष्मी नारायण मंदिरावर हल्ला करणार असल्याचं खलिस्तानींनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी शेअर केला आहे. खलिस्तानींनी दिलेल्या धमकीवर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांनी कॅनडाच्या पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.’Threatened attack on Hindu temple in Canada again’, Canadian MP shares video of Khalistani, demands action
https://x.com/puneet_sahani/status/1726460304027254963?s=20
चंद्र आर्य यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘काही रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात खलिस्तान समर्थकांनी सरे बीसीमधील शीख गुरुद्वाराबाहेर एका शीख कुटुंबाशी गैरवर्तन केले. आता त्याच खलिस्तानी गटाला सरे येथील हिंदू लक्ष्मी नारायण मंदिरात संकट निर्माण करायचे आहे असे दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या सर्व गोष्टी केल्या जात आहेत.
हिंदू मंदिरांवर हल्ले वाढले
कॅनडाचे खासदार पुढे म्हणाले की, तुटलेल्या रेकॉर्डप्रमाणे मी पुन्हा कॅनडाच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्यास सांगत आहे. गेल्या काही वर्षांत हिंदूंच्या मंदिरांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. हिंदू-कॅनेडियन लोकांविरुद्ध द्वेषाचे गुन्हे केले जात आहेत. या गोष्टी उघडपणे आणि जाहीरपणे चालू ठेवू देणे मान्य नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App