बस्तरच्या जंगलातील नक्षलवाद्यांना कोरोनाचा विळखा


बस्तर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जंगलात लपून बसणाऱ्या 10 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला असून 25 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत असल्याचे उघड झाले आहे. यात नक्षलवाद्यांच्या वरीष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. The Naxals in the forest of Bastar were attacked by Corona


वृत्तसंस्था

दंतेवाडा : देशभर आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बस्तर भागातील माओवाद्यांनाही बसला आहे. जंगलात लपून बसणाऱ्या या माओवादी नक्षलवाद्यांना कोरोनाने गाठले असून यात त्यांच्या वरीष्ठ नेत्यांसह किमान दहाजणांचा मृत्यू झाला आहे. इतर पंचवीसपेक्षा जास्त नक्षलवादी कोरोनाबाधीत आहेत. कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये सुजाथा, जयालाल आणि दिनेश यांच्यासारख्या वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, कोरोनावरील लस मिळवण्यासाठी तसेच औषधांसाठी नक्षलवादी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते दरोडेखोरी करू लागले आहेत. कोरोना संसर्गाची जोरदार लाट आणि अन्नातून झालेली विषबाधा यामुळे नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे मरण पावलेले नक्षलवादी दक्षिण बस्तर भागातील आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे. शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांना उपचार मिळवून दिले जातील. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे. दरम्यान, नक्षलवाद्यांचे काही बंडखोर नेतेदेखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. सोमवारी रात्री विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी दहा साथीदारांचे मृतदेह जाळले असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन आठवड्यापूर्वी माओवादी पिडीया गावाजवळ जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या नक्षलवाद्यांनी मुदत संपलेल्या औषधांचे सेवन केले होते आणि हवाबंद अन्न खाल्ले होते. यातून नक्षलवाद्यांना विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिडीयातील बैठकीनंतरच अनेक नक्षलवाद्यांना अन्न विषबाधा, खोकला, सर्दी, ताप आदी त्रास सुुरु झाला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी सुकमा, विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या दुर्गम भागात औषधे आणि कोरोनावरील लस आणण्याचेही प्रयत्न केले.

माओवाद्यांमुळेच दुर्गम भागातील स्थानिकांमध्येही कोरोनाची लागण होऊ लागल्याचाही संशय आहे. कोरोनाचे कोणतेही नियम न पाळणारे नक्षलवादी गावांमध्ये बैठका घेतात, असे पल्लव यांनी सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशात कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडल्यानंतर बस्तर भागात प्रशासनाने सीमावर्ती भागातील गस्त अधिक कडक केली आहे. प्रवासी आणि मालवाहतूक वाहने थांबवली जात आहेत. यातली प्रवाशांची चाचणीही घेतली जात आहे.

The Naxals in the forest of Bastar were attacked by Corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात