वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये ( Pakistan’s ) स्वातंत्र्यदिनापूर्वी मंगळवारी बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. तसेच 6 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील लियाकत बाजारात झेंडे विकणाऱ्या दुकानदारावर हा हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएने सांगितले की त्यांनी परिसरातील दुकानदारांना झेंडे विकण्यास मनाई केली होती. दुकानदारांनी ऐकले नाही तेव्हा त्यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला.
लियाकत बाजार हा क्वेट्टामधील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक आहे. हल्ल्यावेळी येथे मोठी गर्दी होती. पाकिस्तानमध्ये बुधवारी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. BLA ने लोकांना 14 ऑगस्ट रोजी सुट्टी साजरी करू नये असे सांगितले आहे. दरम्यान, सरकारी रुग्णालयाचे प्रवक्ते वसीम बेग यांनी सांगितले की, रुग्णालयात सहा जखमी आणि तीन मृतदेह दाखल झाले आहेत.
यापूर्वीही हल्ले झाले होते, अनेक दुकानदारांनी ध्वजविक्री बंद केली होती
पाकिस्तानी वृत्तपत्र डेली टाईम्सनुसार, अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनी हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. दहशतवाद्यांनी राष्ट्रध्वज विकणाऱ्या स्टॉल्स आणि दुकानांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांना आपला व्यवसाय सोडावा लागला आहे. 2022 आणि 2023 मध्ये अशा घटना घडल्या ज्यात पाकिस्तानचे झेंडे विकणाऱ्या लोकांवर हल्ले झाले.
बलुचिस्तानचे प्रांतीय गृह आणि आदिवासी व्यवहार मंत्री मीर झिया उल्लाह लांगोवे म्हणाले की, सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले. कोणाला धमक्यांची भीती वाटत असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे, असेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more