वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्तास्थापनेची जोरदार तयारी केली आहे. तब्बल २० वर्षानंतर तालिबानचा उपनेता मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला आहे. Taliban deputy leader and co-founder Mullah Abdul Ghani Baradar returns to Afghanistan
कतारची राजधानी दोहा येथे संघटनेच्या इतर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. मुल्ला बरादर युद्धाचा विजेता म्हणून उदयास आला आहे. बरादर अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
बरदार सध्या दोहा येथे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तालिबानचा सहसंस्थापक आणि मुल्ला उमरचा सर्वात विश्वासू असलेला कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदारला २०१० मध्ये कराची येथे अटक झाली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर आणि तालिबानशी झालेल्या करारानंतर, पाकिस्तानने २०१८ मध्ये त्याला सोडले.
कोण आहे मुल्ला अब्दुल गनी बरदार?
अफगाणिस्तानच्या उरुझगान प्रांतात १९६८ मध्ये जन्मलेला बरादार धार्मिक कट्टरवादी होता. तो तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मेहुणा आहे. बरादार १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियन विरुद्ध लढला. १९९२ मध्ये रशियन सैन्याला हाकलल्यानंतर अफगाणिस्तनच्या प्रतिस्पर्धी सरदारांमधल्या गृहयुद्धात तो अडकला होता. त्यानंतर बरादारने कंधारमध्ये त्याचा माजी कमांडर आणि मेहुणा मुल्ला उमर सोबत मदरसा स्थापन केला. यानंतर मुल्ला उमर आणि मुल्ला बरदार यांनी तालिबानची स्थापना केली.
तालिबान सुरुवातीला देशाच्या धार्मिक शुद्धीकरणासाठी आणि इस्लामी अमीरातच्या निर्मितीसाठी समर्पित तरुण इस्लामिक विद्वानांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ होती. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत पार पडले, पण नंतर या गटाने शस्त्र हाती घेतले आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशावरून यांचा हिंसक चळवळीत बदल झाला. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या लष्करी कारवाईत मुल्ला उमर ठार झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App