अफगाण नागरिकांना आता चिंता दाढी अन बुरख्याची, तालिबानी राजवटीत येणाऱ्या निर्बंधाकडे साऱ्यांचे लक्ष


विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर नागरिकांना दैनंदिन जीवन सुरळीतपणे सुरु करू द्यावे असा आदेश तालिबानने त्यांच्या लढाऊ बंडखोरांना दिला आहे, मात्र याआधी १९९६ ते २००१ दरम्यान तालिबानकडे ताबा होता तेव्हा पुरुषांना दाढी वाढविणे सक्तीचे होते, तर महिलांना बुरख्याशिवाय बाहेर पडण्यास मनाई होती. हे दंडक यावेळीही लागू केले जातील अशीच दाट शक्यता आहे.Taliban can adopt very strict rules in Afghan fears people

तणावाच्या वातावरणात एका वृत्तसंस्थेने काही नागरिकांशी संवाद साधला. नान बनवून त्याची विक्री करणारे नामवंत व्यावसायिक गुल महंमद हकीम यांनी सांगितले की, या परिसरात एरवी बरीच वर्दळ असते. बंदुकधारी जवानांच्या सुरक्षेत राजनैतिक अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील वाहने धावत असतात. अशावेळी इथे बसून असे निर्मनुष्य रस्ते बघणे हा विचित्र अनुभव आहे.



हकीम पुढे म्हणाले की, माझी पहिली चिंता म्हणजे दाढी वाढविणे आणि ती सुद्धा लवकर वाढविणे. ती आणि मुलींसाठी घरात बुरख्यांची संख्या पुरेशी आहे का हे सुद्धा मी पत्नीला विचारले.व्यवसायाच्या भवितव्याबद्दल तो म्हणाला की, मी नान बनविणे सुरु ठेवेन,

पण मला फार अत्यल्प कमाई होईल. अनेक सुरक्षा जवानांशी माझी मैत्री झाली होती. ते सर्व जण निघून गेले आहेत. अद्याप मला एकही ग्राहक मिळालेली नाही, पण ते येण्याच्या आशेने मी तंदुरची भट्टी पेटवून ठेवली आहे.

Taliban can adopt very strict rules in Afghan fears people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात