पंतप्रधान मोदींनी पाठवले आहे निमंत्रण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Putin रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, पुतिन यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत आहेत. रशियन दूतावासाने ही माहिती दिली आहे.Putin
क्रेमलिनचे प्रवक्ते युरी उशाकोव्ह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आमच्या नेत्यांमध्ये वर्षातून एकदा भेटण्याचा करार आहे. यावेळी आमची पाळी आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचे निमंत्रण मिळाले असून आम्ही त्यावर गांभीर्याने विचार करत आहोत. पुढील वर्षीच्या सुरुवातीला तारीख ठरवली जाऊ शकते
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. विशेषत: भारताने रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन केले असताना पुतिन यांची भेट या कारणास्तव अत्यंत महत्त्वाची आहे. रशिया आणि भारत यांच्यात त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी दरवर्षी एकमेकांच्या देशाला भेट देण्याचा करार आहे. याच करारानुसार पुतिन भारत भेटीवर येत आहेत. यावर्षी पंतप्रधान मोदी रशियाला गेले होते. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी होणाऱ्या क्वाड कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी भारताला भेट देणार आहेत, हे विशेष.
दोन आठवड्यांपूर्वी क्रेमलिनचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव्ह यांनीही पुतीन यांच्या भारत भेटीची माहिती दिली होती. पेस्कोव्ह म्हणाले की, या वर्षी आम्ही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे दोनदा यजमानपद भूषवले असून लवकरच आम्ही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीची तारीख ठरवू. यापूर्वी जुलैमध्ये पीएम मोदी रशियाला गेले होते आणि 22व्या रशिया-भारत परिषदेत सहभागी झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी कझान येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेलाही हजेरी लावली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App