वृत्तसंस्था
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला दिलेल्या लांब पल्ल्याच्या शस्त्रपुरवठ्यावर टीका करत इशारा दिला की, मॉस्को पाश्चिमात्य देशांवर हल्ला करण्यासाठी अन्य देशांनाही अशा पद्धतीची शस्त्रे देऊ शकतो. Russia threatens after Ukraine attack; Russia will arm others to attack the West
पुतीन यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कुणी असा विचार करत असेल की आमच्या क्षेत्रावर हल्ला करणे आणि आमच्यासाठी समस्या निर्माण करण्यासाठी युद्ध क्षेत्रात अशा शस्त्रांचा पुरवठा करणे शक्य आहे. अशात आमच्या शस्त्रपुरवठा करण्याचा अधिकार का नसावा?पुतीन यांची टिप्पणी एका अमेरिकी सिनेटरच्या त्या पुष्टीनंतर आली, ज्यात त्यांनी मान्य केले की, युक्रेनने रशियाच्या आत जो हल्ला केला, त्यात अमेरिकी शस्त्रांचा वापर केला.
Ukraine Russia War :झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- “रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका”…
हवाई संरक्षण प्रणालीवर झाला हल्ला
इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरच्या अहवालानुसार, १ वा २ जूनला युक्रेनी लष्कराने बेलगोरोड क्षेत्रात एक रशियन एस-३००/४०० एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला केला होता. एअर डिफेन्स सिस्टिम उत्तर खार्कीव्ह क्षेत्रात सीमारेषेपासून ६० किमी व खार्कीव्ह शहरापासून ८० किमीहून जास्त अंतरावर होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App