रशियाने खूप आधी कोरोनावर मात केल्याचा दावा केला असला तरी एप्रिल २०२० ते २०२१ दरम्यान वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख मृत्यू जास्त झाल्याचे उघड झाले आहे. रशियाने जारी केलेल्या डाटाचे विश्लेषण करून रॉयटर या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.Russia hid the deaths from corona, a staggering four-and-a-half million more deaths than the annual average
विशेष प्रतिनिधी
लंडन : रशियाने खूप आधी कोरोनावर मात केल्याचा दावा केला असला तरी एप्रिल २०२० ते २०२१ दरम्यान वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख मृत्यू जास्त झाल्याचे उघड झाले आहे.
रशियाने जारी केलेल्या डाटाचे विश्लेषण करून रॉयटर या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.साथरोग तज्ज्ञांच्या मते कोरोनाने झालेले मृत्यू शोधण्यासाठी एकूण झालेले मृत्यूचा आकडा महत्वाचा ठरणार आहे.
रशियाने म्हटले होते की कोरोनामुळे १ लाख २३ हजार ३७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र, रॉसटॅट या रशियन स्टॅटिस्टिक सर्व्हीसने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात २ लाख ७० हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मात्र, एप्रिल २०२१ मध्ये रशियामध्ये २० हजार ३२३ नागरिकांचा मृत्यू झाला अहे. गेल्या वर्षीपेक्षा मृत्यूची टक्केवारी ११.६ टक्के जास्त आहे. याच आकडेवारीचे विश्लेषण करून रॉयटरने सव्वा चार लाख जादा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App