विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या प्रमुखांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चेमध्ये द्वीपक्षीय मुद्द्यांबरोबरच हिंद-प्रशांत, दहशतवाद, अफगाणिस्तान अशा मुद्द्यांचाही समावेश होता.PM Modi dicuss on various isseus with japan, Aus Pm
कोरोना काळानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची प्रत्यक्ष भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया सर्वंकष धोरणात्मक भागीदारी कराराचा आढावा घेतला.
तसेच, दोन देशांमधील ‘टू प्लस टू’ चर्चेत ठरलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी आणि आगामी क्वाड बैठक यावरही मोदी आणि मॉरिसन यांनी चर्चा केली. अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत असून ते वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे दोघांनी मान्य केले.
पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याबरोबरील बैठकीत भारत-जपान संबंधांचा आढावा घेतला. हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त धोरण कायम ठेवण्यास कटिबद्ध असल्याचे दोन्ही नेत्यांनी यावेळी सांगितले.
संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान यांच्यासह सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर दोघांचे एकमत झाले. जपान हा भारताचा अत्यंत मौल्यवान मित्रदेश असल्याचे मोदी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App